मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या जाळ्यात अडकलेले काही आमदार आता पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ज्यांना मूळ शिवसेनेत परतायचं आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Some disappointed MLAs from Shinde group are in touch with us again says Aditya Thackeray)
एकनाथ शिंदेंच्या फुटीच्या जाळ्यात शिवसेनेचे जे आमदार अडकले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यातील काहीजण आता पुन्हा आम्हाला संपर्क करत आहेत. ज्यांना पुन्हा आमच्यासोबत यायचं आहे त्या सर्वांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. तर ज्यांना शिंदे गटासोबत रहायचं आहे त्यांनी आपले राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, "पहिल्या टप्प्यात जे गद्दार होते, त्यांना काही मिळाली नाही. जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, त्यांनाच पुन्हा मंत्रीपद मिळालं. खाती कोणती मिळाली जी दुय्यम होती. आता मी अनेकांची चेहरे पाहिले. मी त्यांच्या बाजुला बसलो होतो. त्यावेळी माझ्याकडे पाहताना त्यांना वाटत असेल की, तुमच्यासोबत होतो तेच बरं होतं. आता इथे जाऊन आमचा गेम झाला"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.