मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला आहे. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच मराठा आरक्षण नको आहे. असं माझं पुर्वीपासून म्हणणं आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने 15 वर्षे संपुर्ण बहुमताचे सरकार असताना मराठ्यांना आरक्षण देऊ केले नाही. समाजाचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडवावेत असे राज्यातील महाविकास आघाडील अजिबात वाटत नाही. कोणत्याही मार्गांने मराठा आंदोलनं दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूरमध्ये येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
1999 ते 1014 पर्यंत मराठा समाजाकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या सरकारने दूर्लक्ष केलं. धनदांडग्यांकडे फक्त लक्ष दिलं, गरिब मराठा माणसाची परिस्थिती याच सरकारमुळे अधिक बिकट झाली. भाजप सरकारने जे प्रामाणिकपणे समाजाच्या प्रश्वांकडे लक्ष दिले. आरक्षणही न्यायालयात टिकवून दाखवले. परंतु या महाविकास आघाडी सरकाने ते घालवले. अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.