Thane fighting 
मुंबई

Thane News: रिक्षा चालकाशी वाद जीवावर बेतला; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाची हत्या

कार्तिक पुजारी

नालासोपारा- : ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांची विरारच्या अर्नाळामध्ये रविवारी हत्या करण्यात आली आहे. मोरे हे अचानक कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मोरे हे नवाबपूर येथील सेवन सी रिसॉर्टमध्ये कुटुंबीयासमवेत आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या बाहेर रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने त्यांची याठिकाणी काही जणासोबत बाचाबाची झाली. यावेळी काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन, तत्काळ पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी फोनवरून चर्चा करून योग्य ती कारवाही करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी सांगितले.

मृतक मिलिंद मोरे वय वर्षे ४७ हे आपल्या कुटूंबासोबत ठाण्यात राहणारे आहेत.त्यांचे वडील रघुनाथ मोरे धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.रघुनाथ मोरे हे शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख सह विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.रविवारी विरारच्या नवापूर येचीतर सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले होते.

मोरे यांच्या पुतण्याला एका रिक्षा चालकांनी धडक दिली त्यावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि सदर रिक्षा चालक स्थानिक असल्याने आपल्या साथीदारांना बोलवून मोरे यांच्यासह त्याच्या सोबत आलेल्या तीन ते चार मित्र परिवाराला मारहाण केली.

या मारहाणीत मोरे यांना वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदवविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अर्नाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT