Mumbai Local  Esakal
मुंबई

Badlapur School Crime: तब्बल 11 तासांनंतर धावली बदलापूर रेल्वे स्थानकातून पहिली लोकल

सकाळ वृत्तसेवा

Badlapur Latest News : बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूरकर आक्रमक झाले असून त्यांनी रेल्वे बंद आंदोलन केले आहे. त्यांच्या या आंदोलनाचे संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन केले जात आहे.

मात्र रेल्वे वाहतुकीला या आंदोलनाचा थेट फटका बसला होता. या आंदोलनामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अंबरनाथ ते खोपोली दरम्यान ३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेसातच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक वर इंजिन चालवत रेल्वे ट्रॅक ची पाहणी करण्यात आली. त्यानंतर साधारण आठच्या दरम्यान सात वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल चालविण्यात आली. बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल सेवा सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

लोकलसेवा एक तास उशिराने धावत असली तरी लोकल सुरू झाल्यामुळे चाकरमान्यानी सुटकेचा श्वास सोडला. मुंबईहून बदलापूर मार्गे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

कर्जत खोपोली मार्गावरील एकूण ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याण ते वांगणी अप आणि डाऊन मार्गावर प्रथम इंजिन चालवून मार्गाची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

तर दुसरीकडे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या 11 गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

गाड्यांची यादी

22159 - सीएसएमटी - चेन्नई एक्स्प्रेस

11019 - कोनार्क एक्स्प्रेस

22732 - हैदराबाद एक्स्प्रेस

22497 - तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस

19667 - एमवायएस हमसफर एक्स्प्रेस

11029 - कोयना एक्स्प्रेस

22731 - हैदराबाद- मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

22226 - सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस

14805 - यशवंतपुर - बाडमेर वातानुकूलित एक्स्प्रेस

11014 - कोईम्बतूर - मुंबई एलटीटी एक्स्प्रेस

12164 - चेन्नई सेंट्रल - मुंबई एलटीटी एक्स्प्रेस

बदलापूर रेल्वे स्थानकावरून वांगणीला जाण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध आहेत. तर विठ्ठलवाडी येथूनही वांगणीला जाण्यासाठी काही विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.

या ठिकाणी थांबतील बसेस

गांधी चौक, खरवई, रिद्धी सिद्धी, जुवेली फाटा, पोदार, चामटोली, कासगाव, समर्थ वाडी, गोरेगाव, ढवळेपाडा, ढवळेगाव, वांगणी,ढवळे गाव, ढवळे पाडा, गोरेगाव, समर्थवाडी, कासगाव, चामटोली, पोदार, जुवेली फाटा, रिद्धी सिद्धी, खरवई गांधी चौक, बदलापूर रेल्वे स्टेशन.(Alternet Baldapur Route )

बदलापूरकरांनी केलेल्या रेलरोको आंदोलनामुळे बदलापूरपासून ते कर्जत पर्यंतचे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र अंबरनाथ ते सीएसएमटी हे वाहतूक पूर्णपणे सुरू आहे.सीएसएमटी वरून अंबरनाथसाठी विशेष लोकल धावत असून अंबरनाथहूनही सीएसएमटीसाठी विशेष लोकल धावत आहेत

बदलापूरकरांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे बदलापूर पासून ते कर्जत पर्यंतची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र अंबरनाथ ते सीएसएमटी (मुंबई) हे वाहतूक पूर्णपणे सुरू आहे.सीएसएमटी वरून अंबरनाथ साठी विशेष लोकल धावत असून अंबरनाथूनही सीएसएमटी साठी विशेष लोकल धावत आहेत (Mumbai Local Latest Update)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, भक्तांची एकच गर्दी

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान; कधी होणार मतमोजणी?

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटे वड्याचे आप्पे, जाणून घ्या रेसिपी

भिवंडीत विसर्जनास चाललेल्या गणेशमूर्तीवर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांकडून 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, अॅक्सीलेटरवर पाय पडला अन्...

SCROLL FOR NEXT