मुंबई: मुंबई अनलॉक होत असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावरुन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रोज मास्क न वापरणारे किमान 20 हजार जण सापडत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली मास्क न वापरणाऱ्या विरोधात महिनाभर ही विशेष मोहिम राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मार्च महिन्यापासून मुंबईसह राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, तरीही सर्रास मास्क न वापरता वावरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत पाहणी केली असताना त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला आहे. यात, खासकरुन फेरीवाले, लहान मोठे व्यापारी दुकानदार मास्क न वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच, मास्क असला तरी तो संपूर्णपणे नाक आणि तोंड झाकलेला नसतो.
या सर्व प्रकाराची आयुक्त इक्बाल सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. महिनाभर विशेष मोहिम राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून पालिका 200 रुपयांचा दंड वसूल करत आहे.
आयुक्त इक्बाल सिंह स्वत: या मोहिमेवर वॉच ठेवणार आहे. रोज संध्याकाळी स्वत: या मोहिमेचे आढावा घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वापरणे हे धोकादायक असल्याचे वारंवार सांगण्यात आले. त्यानंतरही परिस्थिती बदलत नसल्याने आता गंभीर कारवाई होणार असल्याचंही आयुक्तांनी नमूद केले.
------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Special campaign against non use masks action against 20 thousand citizens daily mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.