मुंबई

आता मुंबई होणार अधिक सुरक्षित, कारण रेल्वे स्टेशन्सवर बसवण्यात येणार 'या' मशिन्स..

भाग्यश्री भुवड

मुंबई - मध्य रेल्वेचे मुंबई विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर आणि हँड ग्लोव्हजसाठी स्वयंचलित वेंडिंग मशीन म्हणजेच कोविड19 प्रिव्हेंटिव्ह कियोस्क पाहायला मिळणार आहेत. विविध उपनगरीय स्थानकांवर  नियोजित हेल्थ एटीएम व्यतिरिक्त या मशीन्सही आता तुम्हा आम्हाला पाहायला मिळतील.

आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बोर्डिंग आणि प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी फेस कव्हर / मास्क वापरावेत. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या प्रवाशाला नवीन मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजची आवश्यकता असेल तर कोविड 19 प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडिंग मशीन डिस्पेंसर ही प्रतिबंधक उपकरणे पुरवणार आहे. या एव्हीएम लवकरच नवीन इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम (एनआयएनएफआरआयएस) अंतर्गत विविध स्थानकांवर उघडल्या जातील. त्याद्वारे अगदी कमी किंमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर बाटली आणि हँड ग्लोव्हज देण्यात येतील. 

सर्वात आधी कुठे लावणार या मशिन्स : 

आधी या मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर सुरु केल्या जातील. त्यानंतर, वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर इत्यादी 12 उपनगरीय स्थानकांवर हेल्थ एटीएम बसवण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.

काय आहे मशीनचा फायदा? 

ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि इतर आरोग्याशी संबंधित 16 ते 18 प्रकारची आरोग्य तपासणी येथे केली जाऊ शकते. त्वरित आरोग्य तपासणी करण्याची इच्छा असणारा कोणताही प्रवासी यापैकी कुठल्याही वैद्यकीय किओस्कमध्ये तपासणीसाठी जाऊ शकेल. हे किओस्क प्राथमिक प्रयोगशाळेच्या चाचणी आणि आपत्कालीन सुविधांनी सज्ज असेल आणि त्यामध्ये वैद्यकीय परिचारक कर्मचारी असतील. 

एवढी असेल किंमत - 

या आरोग्य एटीएमद्वारे देण्यात येणा-या बेसिक स्क्रीनिंग सेवांमध्ये 16 पॅरामीटर्स (आक्रमक नसलेले) फक्त 50 रुपयांमध्ये , तसेच हिमोग्लोबिन आणि ब्लड शुगरची भर घातल्यानंतर 18 पॅरामीटर्सची चाचणी 100 रुपयांत होऊ शकणार आहे.

( संकलन - सुमित बागुल )

special mask sanitizer and gloves vending machines will be installed on various railway stations

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT