ठाणे : वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात युद्धपातळीवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या 1 हजार खाटांनी सुसज्ज अशा कोविड हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.8) आढावा घेतला.
मुंबई येथील बीकेसी येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड-19 रुग्णालयाप्रमाणे ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे देखील 1 हजार खाटांचे कोरोनासाठीचे स्वतंत्र असे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्याचे आदेश शिंदे यांनी नुकतेच ठाणे महापालिकेला दिले होते. ज्युपिटर रुग्णालयाच्या तांत्रिक सहकार्याने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. केवळ तीन आठवड्यात उभारण्यात येणारे हे रुग्णालय लॅब, डायलिसिस, ऑक्सिजन अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णालयाच्या निधीसाठी भाजपचा विरोध
या रुग्णालयाच्या कामासाठी नगरसेवक निधीतून प्रत्येक 5 लाख रुपये घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाकडून तयार कऱण्यात आला आहे. या प्रस्तावाला शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा दिला आहे. भाजपाने मात्र त्याला विरोध केला असून भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी या याबाबतचे पत्र दिले आहे. या रुग्णालयाबाबत स्पष्टता नसल्याने आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.