मुंबई

Special Report : सर्वसामान्यांनी कसे जगावे? बाजारातील भाजी महागली, गृहिणींचा बजेट कोलमडला

भाग्यश्री भुवड


मुंबई : कोरोनासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरी धंद्यावर परिणाम झाला. मात्र, याचा सर्वात मोठा फटका बसला घर चालवणार्या गृहिणींच्या बजेटवर. कारण, घरातील भाजी मोठ्या प्रमाणात महाग झाली असुन भाज्यांचे दर हे गगनाला भिडले आहेत. 

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल खराब झाल्याने त्याची आवकही घटली आहे. शिवाय, अनेक बाजार बंद असल्यामुळे गाड्याही माल घेऊन पोहोचत नसल्याने त्यामुळे भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक भाजीचे दर हे 10 ते 20 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तसेच पालेभाज्यासुद्धा महागल्या आहेत. 

टोमॅटोचे दर हे 35 ते 40 रुपये किलो असून किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री 50 ते 60 रुपये प्रतिकिलो सुरु आहे. तर शेवगा 60 ते 70 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. 80 ते 100 किलोने भाज्या मिळत आहे. आधी लॉकडाऊन आणि आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. गेल्या जुलै महिन्यापासून कांद्याचा आणि इतर भाज्यांचा भाव वाढला आहे. त्यामुळे, सामान्य माणसाने काय खायचं? हा प्रश्न सर्व सामान्यांना सतावत आहे. 

भाज्यांचे दर - प्रतिकिलो 
कांदे
- 35 किंवा 40 रुपये किलो (चांगल्या दर्जाचे 50 रुपये किलो) 
बटाटे - 40 रुपये किलो 
टॉमेटो - 40 रुपये किलो
मेथी - 20 रुपये जुडी 
तेंडली- 20 रुपये पाव किलो
भेंडी - पाव किलो 20 रुपये
दुधी - 80 रुपये किलो 
सुरण - 80 किलो 
कोंथिबीर - जुडी 60 रुपये 
पालक - 20 रुपये जुडी
गवार - 120 रुपये किलो
अंडी - 72 रुपये डझन 

सर्वसामान्यांनी कसे जगावे ? 
साकीनाका येथे राहणाऱ्या स्मिता पाडावे गृहीणी असून लॉकडाऊनमुळे नोकरीवरही परिणाम झाला आहे. यातच वाढलेल्या महागाईमुळे काय खायचं आणि महिन्याचा बजेट कसा राखायचा हा प्रश्न त्यांना सतावतो. सर्वच पालेभाज्या, शिवाय कडधान्ये ही महाग झाली आहेत. मांसाहार करायचा झाला तरी अंडी, मासे आणि मटण या सर्वच गोष्टीच महाग झाल्या आहेत. आणि यापुढेही त्या अजून वाढणार आहेत. सरकारकडून राशन मिळाले पण, ते शिजवण्यासाठी लागणारा गॅसची किंमतही वाढली आहे. शिवाय, लाईट बिल, पाणी बिल मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सर्वच गोष्टींचा विचार करुन खर्च करावा लागतो.  

जेवणात हिरव्या पालेभाज्या नाहीच
दिवसेदिवस भाजीपाल्याचे दर गगनाला भिडत आहेत. त्यामुळे गरीबांना भाजी घेणेच परवडत नाही. मग कुटुंबाला काय खायला द्यायचे असा प्रश्न आहे. सध्या घरकाम, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना पडला आहे. कोरोना संसर्गामुळे अनेक सोसायट्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांना, कामगारांना बंदी घातली आहे. त्यातच हिरव्या पाले भाज्या, कांदे, बटाटयाचे दर दररोज वाढत चालले आहे. मग जेवणात भाजी खाणे मुश्किल झाले आहे.

- जिवन तांबे

चेंबुर भागात घरकाम करणाऱ्या प्रिया कांबळे यांनी गेले कित्येक दिवस भाजी विकत घेतली नसल्याचे सांगितले.  दर स्वस्त झाले तेव्हा कांदे घेऊन टाकले. एक दोन अंडी आणून त्याची भाजी करते. त्यात कांदा पूर्ण न कापून टाकता अर्धा टाकते. भाजी आणि बटाट्याचे नाव कुणी काढत नाही. त्यांचा मुलगा बालवाडीत आहे. त्याला डाळ मिळते त्यावर कसे बसे दिवस काढतो. डाळ आणि भुर्जी बरोबर कधीतरी टोमॅटो विकत आणून त्याची चटणी बनवते. रेशन वरचे तांदूळ मिळतात त्यामुळे खिचडी भात बनवून खाते, असे त्यांनी सांगितले. हाताला काम नाही. हा कोरोना कधी जाईल? या आशेवर त्या कुटुंबाचा गाडा कसाबसा ढकलत आहे.

Special Report How should the common man live Market vegetables are expensive

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT