मुंबई

विद्यार्थ्यांनो ही खास बातमी तुमच्यासाठी, स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जाणून घ्या

प्रशांत कांबळे

मुंबई: मध्य रेल्वेने नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एन) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान असलेल्या परीक्षेसाठी जाणाऱ्या एनडीए आणि एन परिक्षार्थींच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार असून,मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, नागपूर,भुसावळ,पुणे या पाच ही विभागातून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.

यामध्ये सीएसएमटी ते सावंतवाडी, मडगाव आणि काेल्हापुर ते सावंतवाडी तर मध्य रेल्वे मार्गावर साेलापुर, पुणे, नहमदनगर, नाशिक, भुसावळ, नागपुर ते मुंबई, पुणे-हैद्राबाद, काेल्हापुर-नागपुर, पुणे-नागपुर, अमरावती-नागपुर, जळगाव-नागपुर, पनवेल-नागपुर, अहमदनगर-नागपुर, अकाेला-नागपुर, मुंबई-हैद्राबाद दरम्यान या स्पेशल ट्रेन धावणार आहे. मात्र यादरम्यान परिक्षार्थीना काेविड संदर्भात केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

तर मध्य रेल्वेतून सुटणार्‍या पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे बुकिंग मेमू विशेष वगळता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
 
अशा धावतील ट्रेन

सोलापूर-मुंबई विशेष  (2 फे-या)
01254 विशेष सोलापूर येथून 5 सप्टेंबर रोजी रात्री 10.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.35 वाजता पोहोचेल.  
01253 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 6.50 वाजता सोलापूरला पोहोचेल. 

थांबे : कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर

- पुणे-मुंबई विशेष  (2फे-या)
01130 विशेष पुणे येथून 5 सप्टेंबर रोजी 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.  
01129 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 सप्टेंबर  रोजी 10.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मध्यरात्री 3.15 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : लोणावळा, कल्याण, दादर.

- अहमदनगर-मुंबई विशेष  ( 2फे-या)
01132 विशेष अहमदनगर येथून 5 सप्टेंबर रोजी 9 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 5.35 वाजता पोहोचेल.  01131 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अहमदनगर येथे पहाटे 4.40 वाजता पोहोचेल.
थांबे : मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर

- नाशिक रोड - मुंबई विशेष  (2 फे-या)
01134 स्पेशल नाशिकरोड येथून 5 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4.5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.  01133 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 सप्टेंबर रोजी 11.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नाशिक रोड येथे मध्यरात्री 3.15 वाजता पोहोचेल.
थांबे : इगतपुरी, कल्याण, दादर

- भुसावळ - मुंबई विशेष ( 2फे-या)
02172 विशेष भुसावळ येथून 5 सप्टेंबर रोजी 9.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.  
02171 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 सप्टेंबर रोजी 9.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4.30 वाजता भुसावळ येथे  पोहोचेल. 
थांबे : जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर

- मुंबई-सावंतवाडी रोड विशेष  (4 फे-या)
01135 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर रोजी 10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सावंतवाडी रोड येथे सकाळी 8.10 वाजता पोहोचेल.  
01136 विशेष सावंतवाडी रोड येथून 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर वाजता दुपारी 12.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे  त्याच दिवशी 11 वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

- पुणे-हैदराबाद स्पेशल (2 फे-या)
01155 विशेष पुणे येथून 5 सप्टेंबर रोजी दि. ५.९.२०२० रोजी दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल.  
01156 विशेष हैदराबाद येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1.15 वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे : दौंड, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट

- कोल्हापूर-नागपूर विशेष (2 फे-या)
01137 विशेष कोल्हापूर येथून 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8.5 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 5.40 वाजता नागपूरला पोहोचेल.  
01138 विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी 8.30 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
थांबे :  मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.  

- पुणे-नागपूर विशेष  (2 फे-या)
 02159 विशेष पुणे येथून 5 सप्टेंबर रोजी 4.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 6.15 वाजता नागपूरला पोहोचेल.  
02160 विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी रोजी 8.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 11.55  वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.  

- मुंबई-नागपूर विशेष (2 फे-या)
02161 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 5 सप्टेंबर रोजी 5.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजता नागपूरला पोहोचेल.  
02162 विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी 9 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.  

- नाशिक रोड-नागपूर विशेष  (2 फे-या) 
01263 विशेष नाशिक रोड येथून 5 सप्टेंबर रोजी 4.10 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी मध्यरात्री 3 वाजता नागपूरला पोहोचेल.  
01264 विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी 9.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 7.30 वाजता नाशिक रोड ला पोहोचेल.
थांबे : मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.

- अमरावती- नागपूर मेमू विशेष (2 फेऱ्या)
01139 मेमू विशेष अमरावती येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 12.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पहाटे 5.25 वाजता नागपूरला पोहोचेल. 
01140 मेमू विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी 11 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4 वाजता अमरावतीला पोहोचेल.
थांबा : वर्धा.

- जळगाव - नागपूर मेमू स्पेशल (2 फे-या)
02165 मेमू विशेष जळगाव येथून 5 सप्टेंबर रोजी 9.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4.20 वाजता नागपूरला पोहोचेल.  
02166 मेमु विशेष नागपूरहून 6 सप्टेंबर रोजी 10.45 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 4.20 वाजता जळगावला पोहोचेल. 
थांबे : भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.

- अकोला-नागपूर मेमू विशेष  (2 फे-या)
01141 मेमु विशेष अकोला येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजता सुटेल व त्याच दिवशी सकाळी 5 वाजता नागपूरला पोहोचेल.  
01142 मेमु विशेष नागपूरहून 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अकोला येथे 11.55 वाजता पोहोचेल.
थांबे : बडनेरा, वर्धा.

- अहमदनगर- नागपूर विशेष  ( 2 फे-या)
02167 विशेष अहमदनगर येथून 5 सप्टेंबर रोजी 4 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4 वाजता नागपूरला पोहोचेल.  
02168 विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी 10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10.40 वाजता अहमदनगरला पोहोचेल.
थांबे : बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
 
- पनवेल-नागपूर विशेष  (2 फे-या)
02169 विशेष पनवेल येथून 5 सप्टेंबर रोजी 1.50 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी मध्यरात्री 3.30 वाजता नागपूरला पोहोचेल.  
02170 विशेष नागपूरहून 6 सप्टेंबर रोजी 10.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.  

- बल्हारशाह - नागपूर मेमू विशेष  ( 2 फे-या)
01143 मेमु विशेष बल्हारशाह येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 12. 30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पहाटे 4.45 वाजता नागपूरला पोहोचेल.  
01144 मेमु विशेष नागपूर येथून 6 सप्टेंबर रोजी 11.15 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता बल्हारशाहला पोहोचेल.
थांबे : चंद्रपूर, सेवाग्राम

- पुणे-अहमदाबाद स्पेशल ( 2 फे-या)
01145 विशेष येथून 5 सप्टेंबर रोजी  5.30 वाजता  पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.45 वाजता अहमदाबादला पोहोचेल.  
01146 विशेष अहमदाबाद येथून 6 सप्टेंबर रोजी 8.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा

- मुंबई- मडगाव विशेष मार्गे पुणे-मिरज ( 2 फे-या)
01147 विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11.5 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता मडगावला पोहोचेल.  
01148 विशेष मडगाव येथून 6 सप्टेंबर रोजी 8 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1.5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा.

- कोल्हापूर - मडगाव विशेष  (2 फे-या)
01149 विशेष कोल्हापूर येथून 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 4.30 वाजता मडगावला पोहोचेल.  
01150 विशेष मडगाव येथून 6 सप्टेंबर रोजी 8.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 5.30 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे : मिरज, बेळगावी, लोंडा.

- कोल्हापूर- धारवाड विशेष  (2 फे-या) 
01151 विशेष कोल्हापूर येथून 5 सप्टेंबर रोजी 10  वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 4.50 वाजता धारवाडला पोहोचेल.  
01152 विशेष धारवाड येथून 6 सप्टेंबर रोजी 9 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे : मिरज, बेळगावी, लोंडा.

- पुणे- धारवाड विशेष ( 2 फे-या)
01153 विशेष पुणे येथून 5 सप्टेंबर रोजी 5.5  वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.50 वाजता धारवाडला पोहोचेल.  
01154 विशेष धारवाड येथून 6 सप्टेंबर रोजी 8 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 7.50 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा.

- मुंबई- हैदराबाद विशेष (2 फे-या)
01157 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 6.15 वाजता हैदराबादला पोहोचेल.  01158 विशेष हैदराबाद येथून 6 सप्टेंबर रोजी रात्री 9.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 11.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस  येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलाबुरागी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट

(संपादनः पूजा विचारे) 

special train run Central Railway students Know the schedule

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

SCROLL FOR NEXT