मुंबई : स्पाइसजेट या खासगी विमानसेवा क्षेत्रातील कंपनीच्या वैमानिकांनी भत्ता आणि पगार वाढीच्या मागणीला घेऊन गुरुवारपासून (ता.१४) सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्पाईसजेटच्या विमाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे. भत्ता आणि पगार वाढीच्या मागणीला घेऊन स्पाईसजेटच्या वैमानिकांनी उद्यापासून सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर येत आहे. याबाबद समाज माध्यमावर एक पोस्टही वॉयरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून भत्ता आणि पगारात वाढीची मागणी करतोय. मात्र, आतापर्यंत ही मागणी मान्य झालेली नाही.
आता फक्त भत्ता मिळेल पण पगार वाढ होणार नाही असे ईमेल कंपनीकडून येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून याच्या विरोध केला पाहिजे. याकरिता १४ जुलै २०२२ रोजी कोण्ही वैमानिकांनी उड्डाण करणार नाही. तुमच्या एअरलाइनचा आदर विसरून जा, तुम्हाला माहीत आहे की असे होणार नाही. आम्ही 2 वर्षांची प्रतीक्षा केली आहे. आता सन्मानाची मागणी करण्याची वेळ आली आहे, GoFirst ने ते केले आहे, इंडिगोने ते केले आहे. हा आमचा लढण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्व वैमानिकांनी कामावर जाऊ नयेत, असे आहवान पोस्टमध्ये करण्यात आले आहे. मात्र, याबाबद अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. स्पाईसजेटचे जनसंपर्क अधिकारी आनंद देवरा यांना संदर्भात सकाळने विचारले असता त्यांनी सांगितले की, स्पाईसजेटच्या वैमानिक सामूहिक सुट्टीवर जाणार नाही आहेत. आंदोलनाबाबद अशी कोणतीही हाक वैमानिकाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नकात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.