मुंबई: मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या(एसआरपीएफ) एका पोलिस उपनिरीक्षकाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जालन्यावरून बंदोबस्तासाठी ते मुंबईत आले होते.
मृत 51 वर्षीय उपनिरीक्षक राज्य राखीव पोलिस दलाच्या गट तीनमध्ये कार्यरत होते. रविवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 21 जूनला उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईत कार्यरत 82 राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व 77 जवानांचा समावेश आहे.
मुंबईत आतापर्यंत 2395 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1667 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे 65 टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील 722 जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. 282 पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर 663 पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.
मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 452 पोलिस उपचार घेत आहेत. तर 205 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. याशिवाय 35 पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे.
SRPF oficer is no more due to corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.