Maharasthra News: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात दोन वर्षांत ५,२५० इलेक्ट्रिक बससह ११,२६० बस गाड्यांची भर पडणार आहे. यापैकी काही गाड्या एसटीच्या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली आहे. तर, उर्वरित गाड्या लवकरच येणार आहेत. यामुळे मुंबईसह राज्यातील एसटीची बससेवा अधिक सक्षम होणार आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यांतील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या; मात्र मागील तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आलेल्या नाहीत.
आयुर्मान संपुष्टात आलेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी दोन हजार गाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाने इलेक्ट्रिक बससोबत साध्या गाड्या वाढण्यावर भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात ५,१५० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यापैकी ६० बस एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ई-शिवनेरीच्या १०० बसपैकी ८६ बस ताफ्यात आल्या असून उर्वरित बस काही दिवसांत येणार आहेत. तसेच, डिझेलवर चालणाऱ्या सहा हजार गाड्या येणार आहेत. यातील २,२०० बसची वर्कऑर्डर झाली. टप्प्याने बस ताफ्यात येणार आहेत. याशिवाय २,५०० बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. १,३१० साध्या बस खासगी भाड्याने घेणार असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार आहेत.
--------
दोन वर्षांत ११,२६० गाड्या येणार
५,१५० इलेक्ट्रिक बसपैकी ६० बस आल्या
ई-शिवनेरी १०० पैकी ८६ बस आल्या
दर महिन्याला सध्या बस ३०० येणार
२,५०० बस निविदा प्रक्रिया सुरू होणार
१,३१० साध्या बस खासगी भाड्याने घेणार
=======
एसटीच्या ताफ्यात नवीन गाड्या आल्यानंतर शहरांसह गावखेड्यांतील बससेवेला गती मिळणार आहे. कोरोनापूर्व ६५ लाख प्रवासी संख्या होती. नवीन गाड्या आल्यानंतर तो आकडा गाठणे सोपे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.