- कल्याणच्या एसटी डेपो व्यवस्थापकांच्या तत्परतेचं गुणगान गायलं जातंय
मुंबई: मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्यानंतर अर्ध्यातच अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना दुसऱ्या दिवसाची पहाट होण्यापूर्वीच एसटी महामंडळाने सुरक्षित निश्चित स्थळी पोहचवले. 22 जुलै रोजीच्या कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस होता. तर रेल्वेच्या रुळावरही पाणी भरल्याने रेल्वे रुळाखालील मलबा वाहून निघाल्यानंतर कसारा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळेच लांब पल्यांवरील मेल, एक्स्प्रेस गाड्या अर्ध्यातच थांबवल्या मात्र, कल्याण रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर आणि कल्याणचे एसटी डेपो मॅनेजर यांच्या तत्परतेमुळे मुसळधार पावसात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना मात्र सुरक्षित आपल्या निश्चित स्थळी पोहचविण्याची यशस्वी मोहीम कल्याण एसटी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी यशस्वी पार पाडली. (ST Buses helped Rescue Operation of Train Passengers in Kasara Ghat Landslide Incidence Praise all over)
मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली, कोकणातील गावांचा संपर्क तुटला, मुंबईच्या रस्त्यावर पाणी भरले अशा बातम्या सुरू असतांनाच कसारा, इगतपुरी दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याची बातमी आली. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तर लांब पल्यांच्या प्रवासी गाड्याही अर्ध्यातच खोळंबल्या होत्या. दरम्यान एसटीच्या नियोजनाचे काम बघत असतांना कल्याण रेल्वे स्टेशन मास्तरांनी तत्परता दाखवत कल्याण एसटी डेपो मॅनेजर यांना फोन करून बसेस देण्याची विनंती केली. ज्यावर विजय गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता आपत्ती व्यवस्थानाचे काम बजावण्याचा निर्णय घेत हजारो प्रवाशांना आपल्या सुरक्षित स्थळी पोहचवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे.
रात्रभरात पूर्ण केलेल्या यशस्वी मोहिमेमध्ये सर्वाधिक कसारा, इगतपुरी जवळ असलेल्या डेपोतील बसेसची मोठी मदत झाली यामध्ये शहापूर डेपोने महत्वाची भूमिका निभावली. एकट्या शहापूर डेपोतूनच 28 बसेस सोडण्यात आले होत्या. या आपत्कालीन परिस्थित्तीच्या दरम्यान गायकवाड यांना यापूर्वीच्या अनुभव कामाला आले असून, एसटी कर्मचारी आणि प्रशासन नेहमीच आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
विभाग नियंत्रक विनोद भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल यांच्या मार्गदर्शनात कसारा घाटातील मोहीम राबविण्यात आली. रात्रभर या मोहिमेचे नियोजन सुरूच होते. तर नियमित रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन आणि एसटी कर्मचार्यांशी संपर्क करून, पहाटेपूर्वीच कसारा घाटात अडकलेल्या प्रवासी रेल्वे गाड्यांमधून सर्व प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचविण्यात एसटी महामंडळाला यश आले.
- विजय गायकवाड, एसटी आगार व्यवस्थापक, कल्याण
कसारा घाटातील मोहिमेत आगार निहाय गाड्या
कल्याण - 19बसेस
शहापूर - 28 बसेस
भिवंडी - 15 बसेस
ठाणे-1 - 10 बसेस
ठाणे-2 - 15 बसेस
विठ्ठलवाडी - 10 बसेस
वाडा - 7 बसेस
एकूण - 104 बसेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.