st employee did not get salary msrtc high court marathi news mumbai Sakal
मुंबई

Mumbai News : ST कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तारीख पुन्हा चुकली; 5 दिवस होऊनही वेतनापासून कर्मचारी वंचित

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या निवृत्ती नंत्रा एसटी महामंडळाचे नियोजन ढासळले

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या निवृत्ती नंत्रा एसटी महामंडळाचे नियोजन ढासळले आहे. संप काळात उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने ७ ते १० या दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अद्याप पाच दिवस होऊनही वेतन झाले नाही.

परिणामी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असलेले बँकेचे हफ्ते इतरांचे देनी आणि घर खर्चाचे नियोजन बिघडले असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. चन्ने यांच्या निवृत्तीनंतर एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा प्रभार देण्यात आला आहे.

परिवहन आयुक्तांकडे विवेक भिमनवार यांच्याकडे एसटी महामंडळाचा प्रभार देण्यात आला असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या नियोजनात यावेळी अडचणी आल्याचे दिसते आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या अधिकारी,

कर्मचारी संघटनांकडून नियमित व्यवस्थापकीय संचालक अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याने पुन्हा एकदा कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहे.

कुटुंब गावी ठेऊन ड्युटी नियमित करण्यासाठी आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो, ७ तारखेला वेतन होईल म्हणून घर मालकांना सांगितले असते. मात्र, वेतनच वेळेत होत नाही. अशावेळी ड्युटी करायची की आर्थिक विवंचनेत राहायचे असे नाव न लिहिण्याच्या अटीवर एका वाहकाने सकाळ शी बोलताना सांगितले आहे.

सोमवारी (ता.११) रोजी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, वेतन न झाल्यास महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने एसटी महामंडळ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तीगोटे यांनी सांगितले आहे.

एसटी महामंडळाला तातडीने नियमित व्यवस्थापकीय संचालक पद भरण्याची गरज आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आधीच एसटी महामंडळाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे.

अशात आता नियोजनाची बोंब झाल्यास पुन्हा एसटीच्या अनियोजनामुळे महसुलावर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय, तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासनाने करावे.

- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

संप काळात न्यायालयात त्री सदस्यीय समितीने एस. टी. कामगारांना महिन्याच्या १० तारीख पर्यंत वेतन देण्याचे मान्य केले होते. न्यायालयाचा अवमान झालेला आहे. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे गांभीर्य दिसत नाही.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT