मुंबई

या जिल्ह्यात एसटी फॉर्मात; परतीच्या प्रवासासाठी  तब्बल 200 गाड्यांचे आरक्षण

प्रमाेद जाधव

अलिबाग  : गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांनी शुक्रवार (ता. 28) पासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा रायगडमधील चाकरमान्यांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बसला अधिक पसंती दिली असून 30 ऑगस्टपर्यंत सुमारे 380 गाड्यांचे आरक्षण झाले आहे. यामध्ये 200 बसचे गट आरक्षण करण्यात आले आहे. एसटीतून प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित असल्याने मोठी पसंती मिळाल्याचे चाकरमान्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आदी शहरातून मूळ गावी येण्यासाठी रायगड जिल्ह्यातील चाकरमान्यांनी एसटीपेक्षा खासगी वाहनांना पसंती दिली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्याची दखल घेत रायगडच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी मुंबईकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांना चांगली सेवा मिळावी, यासाठी 60 बस सोडण्याचे नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून रविवार (ता.30) पर्यंत गट आरक्षणासाठी 200 बस; तर नियमित सुमारे 180 बसचे आरक्षण झाले आहे. सर्वात चांगला प्रतिसाद महाड, श्रीवर्धन आणि माणगाव आगारातून मिळाला; तर अलिबाग आणि रोहा आगारातून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाचे सावट असल्याने प्रवाशांनी एसटी बस आगारात जास्त गर्दी न करता, घरूनच ऑनलाईन आरक्षणावर अधिक भर दिला. 

...म्हणून एसटीचे उत्पन्न घटले 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने एसटीची आंतरजिल्हा बंदी उठवून 20 ऑगस्टपासून सेवो सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील चाकरमान्यांना येण्यासाठी एसटीचे नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या अवघ्या दोन दिवस आधी एसटी सुरू झाल्याने आरक्षणासाठी चाकरमान्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या पैकी बहुसंख्य चाकरमान्यांनी खासगी वाहनांचा अधार घेत गाव गाठले. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. 


मुंबईच्या परतीच्या प्रवाशांसाठी चांगली सुविधा देण्याकडे एसटीचा कल आहे. या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केले होते. चाकरमान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तो आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड एसटी महामंडळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT