मुंबईः पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लेडीज स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला. मध्य रेल्वे प्रशासनानेही या निर्णयाचा विलंब न लावता लवकरात लवकर निर्णय घेत मध्य रेल्वे मार्गावरील महिलाप्रवाशांनाही दिलासा द्यावा अशी मागणी आता महिलावर्गातून जोर धरु लागली आहे. या मागणीचा विचार वरीष्ठ पातळीवर मांडून चाचणी करुन नंतर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मध्य रेल्वे प्रवाशसाने उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाला दिले आहे. असे असले तरी निर्णय प्रक्रियेस विलंब लावू नये, मध्य रेल्वे प्रशासन कायम उशीरा जागे होते असे मत महिला प्रवाशांनी मांडले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी तसेच खासगी बॅंकेतील दहा टक्के कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. फेऱ्यांमध्ये वाढ झाली असली तरी महिला प्रवाशांसाठी लोकलच्या डब्यांची संख्या कमी असल्याने महिलांच्या डब्ब्यात गर्दी उसळत होती. कोरोना संकट काळात सोशल डिस्टसिंगचे पालन या गर्दीत करायचे कसे हा संदेश देत हे गर्दीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाले. याचा विचार करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने सकाळ आणि संध्याकाळ लेडीज स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून सोमवार पासून या लोकल चालविल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे प्रशासनाप्रमाणेच मध्य रेल्वे प्रशासनानेही महिला प्रवाशांची लोकल डब्यात होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे मार्गावर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु करावी अशी मागणी महिला वर्गातून जोर धरत होती. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट याविषयी चर्चाही केली. वरीष्ठ पातळीवर हा विचार मांडून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी महिला वर्गाला दिले. असे असले तरी आश्वासनावर आमचा विश्वास नाही, रेल्वे प्रशासनाने निर्णय घेण्यास विलंब करु नये अशी मागणी महिला प्रवासी करीत आहेत.
प्राची निमसे, प्रवासी कल्याण
आरती खामकर, प्रवासी डोंबिवली
काजल पाखरे, प्रवासी ठाणे
------------
(संपादनः पूजा विचारे)
Start special ladies local Central Railway route demand women passengers
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.