पाली : शाळेतील पोषण आहार संपल्याने रिकामे असलेले धान्याचे डबे. 
मुंबई

सुधागड तालुक्‍यातील शेकडो विद्यार्थ्यांची उपासमार

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्‍यातील अनेक शाळांमध्ये तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहार आलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक पोषण आहार देण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांची तारेवरची कसरत होत आहे.

सुधागड तालुक्‍यात रायगड जिल्हा परिषदेच्या १५४ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये ४ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा तालुका आदिवासीबहुल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार आधार ठरतो; परंतु तीन महिन्यांपूर्वीच बहुसंख्य शाळांतील शालेय पोषण आहार संपलेला आहे. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण खर्च मुख्याध्यापकांना स्वतःच्या, जनतेच्या व लोकसेवकांच्या खिशातून; तर कधी उसनवारी करून करावा लागत आहे आहे. 

सिद्धेश्वर गावातील शाळेत शालेय पोषण आहार योजनेचा पूरक आहार चार महिन्यांपासून येत नाही, असे शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सांगितले.  

विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून..
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००३ पासून महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पोटभर आहार मिळावा. त्यांच्या वाढणाऱ्या वयानुसार प्रथिने, उष्मांक मिळावेत. शाळेत येणारा कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये, हा या योजनेमागील उद्देश आहे.

शालेय पोषण आहार हा संपूर्ण तालुक्‍यात व्यवस्थितपणे पोहचत आहे; परंतु जुलै महिन्यापासून शालेय पोषण आहार सुधागड तालुक्‍यात देण्यात आला नाही. संबंधित शालेय पोषण आहार सुधागडमध्ये पोहविण्याचे काम मार्केट फेडरेशनकडे आहे. याबाबतीत तक्रार आली नाही; पुरवठा कमी असेल, देण्यासाठी प्रयत्न करू.
- शिल्पा दास- पवार, गट शिक्षणाधिकारी, पाली-सुधागड

शालेय पोषण आहारासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासंबंधीचे पत्रदेखील त्यांना देण्यात आले आहे. तालुक्‍यात अनेक शाळांना पोषण आहार उपलब्ध नसणे ही प्रशासकीय यंत्रणेची चूक आहे. लवकर ही समस्या मार्गी लावावी.
- उमेश यादव, सरपंच, सिद्धेश्वर (बुद्रुक)

चार महिन्यांपासून शालेय पोषण आहार सिद्धेश्वर शाळेत पुरविण्यात आला नाही. विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उपाशी पोटी कसे शिकायचे?
- नितीन यादव, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सिद्धेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT