Balasaheb Thorat  Esakal
मुंबई

Balasaheb Thorat : प्रदेश काँग्रेस बंडाळीच्या उंबरठ्यावर! थोरातांच्या बंडाला ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सरळ सरळ आघाडी उघडली असून, बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.

संजय मिस्कीन

मुंबई- शिवसेनेतील बंड अद्याप शमलेले नसताना प्रदेश काँग्रेस देखील बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत असून, विधिमंडळ पक्षासह संघटनेतील संभाव्य दुफळी रोखण्याचे आव्हान हायकमांडसमोर उभे राहणार, असे चित्र आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सरळ सरळ आघाडी उघडली असून, बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.

१० फेब्रुवारीला काँग्रेसच्या नवनियुक्त विधानपरिषद आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याने प्रभारी एच.के. पाटील यासाठी येणार आहेत. याच दिवशी काँग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीऐवजी प्रदेशच्या कार्यकारिणीची विशेष बैठक १५ फेब्रुवारीला बोलविण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसमधे काही आमदारांमधे नाराजीचा सूर असल्याने थोरात यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना बळ मिळाल्याचे चित्र आहे. थोरात यांनी पक्षातील त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत संवाद साधत पक्षाच्या व्यासपीठावरच याबाबत चर्चा व्हावी अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

आमदार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून सुरू झालेला हा पक्षांतर्गत संघर्ष आता थोरात यांनी हाती घेतला आहे. काँग्रेसचे नेते थोरात यांना बदनाम करण्यासाठी आणि तांबे कुटुंबाला पक्षाबाहेर काढून षडयंत्र रचले,

असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. त्यानंतरच थोरात यांनी पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता पक्षात परस्पर निर्णय घेतले जात असून पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात आपल्याविरोधात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. अशा गोष्टीमुळेच आपल्याला पटोलेंसोबत काम करणे शक्य नाही,

अशी नाराजी व्यक्त करत थोरात यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ‘लेटरबॉम्ब’ टाकल्याची माहिती आहे. मात्र, थोरात यांनी असे पत्र पाठविले नसावे, असा दावा स्वतः पटोले यांनी केला आहे.

थोरांतांच्या म्हणण्यानुसारच उमेदवारी !

पटोले म्हणाले, की थोरात यांनीच डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी देण्याचे सांगितले होते. त्यानुसार मी हायकमांडला प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावावरूनच पक्षश्रेष्ठींनी डॉ. तांबेंना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यानंतर तांबेंनी आपले आभार मानल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे त्यांच्या घरचे भांडण आहे, पक्षाचे नाही, असे सांगतानाच पटोले यांनी थोरात यांच्या विरोधात आम्ही एक शब्द बोललो नसल्याचे सांगितले.

राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन

‘‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले असून अब्जावधी रुपयांचा महागैरव्यवहार झाला असताना मोदी सरकार अदानी यांच्या चौकशीला का घाबरत आहे का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.काँग्रेसच्या वतीने सोमवारी राज्यभरात अदानींच्या विरोधात एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT