varsha gaikwad 
मुंबई

बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी वर्षा गायकवाडांची सावध भूमिका

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द (HSC Exam) करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. या परीक्षेत विरोधात कोणी न्यायालयात जाऊ नये म्हणून त्यासंदर्भातील घोषणा करण्यापूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यासाठीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. (state education minister varsha gaikwad cautious approach before declaring cancellation of hsc exam)

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव सादर करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेबाबत राज्यातील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊनच लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा मागील महिन्यात रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा ही सुरुवातीला 23 एप्रिलपासून घेतली जाणार होती, मात्र कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने ती परीक्षा मे अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांना जास्त प्रादुर्भावाची भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सूसूत्रता असायला हवी अशी भूमिका घेतली आहे.

ही सर्व माहिती आजच्या बैठकीत सर्वांसमोर मांडल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाच राज्य सरकारचे प्राधान्य असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल, असे देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

Vidhan Sabha Election: उत्तर महाराष्ट्रात दीड कोटी मतदारांची नोंद! हजारो अर्ज प्रलंबित; विधानसभा निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढणार

Hyundai India IPO: LICचा विक्रम मोडणार! Hyundai आणणार देशातील सर्वात मोठा IPO; सेबीने दिली मंजुरी

Mahindra: टाटांच टेन्शन वाढलं! महिंद्रा लवकरच करणार स्कोडा सोबत मोठा करार; गुंतवणूकदार मालामाल होणार?

मॅनेजरने सिक लिव्ह दिली नाही, नोकरी जाण्याच्या भीतीने कामावर आली अन् सगळंच संपलं

SCROLL FOR NEXT