corona vaccination sakal media group
मुंबई

सरकारला त्यांच्या लशींवर भरोसा नाही का?- प्रवासी संघटना

कुलदीप घायवट

मुंबई : सरकारला जर त्यांनी दिलेल्या लशीवर विश्वास असेल, कोणतीही शंका नसेल तर, सरकारने कोरोनाच्या दोन लस (State Government vaccine) घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची (Local train traveling) मुभा दिली पाहिजे. अन्यथा, सर्वांना हेच कळून चुकेल की, सरकारलाच त्याच्यां लशीवर भरोसा नाही, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून (Local Train Traveling union) उमटत आहे. सरकारने लसीकरणाचा वेग वाढल्याने बहुतांश सर्वसामान्य नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांचे होणारे हाल पाहून सर्व स्तरातून लोकल सुरू करण्यात यावी. प्राधान्याने दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्याने लोकल प्रवासाची (Local train traveling permission) अनुमती द्यावी, अशी मागणी राजकीय नेते, समाजसेवक, प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ( state government doesn't have belief on their vaccine asks travelling union)

मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भाव असल्याने मुंबई महानगरातील सामान्य नागरिकांना काही काळ सोडला तर, लोकल प्रवास बंद ठेवली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू आहे. कल्याण पलीकडील भागातून मुंबईत येण्यासाठी कोणतीही बळकट अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे लाखो कर्मचारी, दूध, मासे विक्री करणारे, घरकाम करणारा महिला वर्ग, हातावर पोट असलेला वर्ग दुर्लक्षित झाला आहे. खासगी कर्मचारी वर्गाला कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशाचे पालन केले नाही, तर कामावरून काढून टाकतील, ही चिंता सतावत आहे. त्यामुळे जीवावर बेतून लोकलमध्ये प्रवेश करण्याचे धाडस करत आहे. मात्र, विनातिकिट पकडले जाण्याच्या भीतीने लोकलला पर्याय असलेल्या वाहतूकीतून प्रवास करत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लाॅकडाऊन, कडक निर्बंध सुरू आहे. त्यानंतर, लसीची निर्मिती करून लस सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाचे दोन डोस घेतले की त्याला कोरोना होत नाही. त्यामुळे सरकारने देखील लसीकरणाचा वेग वाढवला. नागरिक मोठ्या विश्वासाने लस घेत आहेत. त्यामुळे दोन लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला केला पाहिजे. दोन लसी घेऊनही लोकल प्रवास खुला होत नसेल, तर सरकारलाच लसीवर भरोसा नाही असे स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT