Devendra Fadnavis-Sharad Pawar esakal
मुंबई

शरद पवारांनाही समजूंदे त्यांच्या मंत्र्याने काय रंग उधळले - देवेंद्र फडणवीस

"मुंबईचे मारेकरी, बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून नवाब मलिक यांनी जमीन का विकत घेतली? सलिम पटेल कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का?"

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या माणसांकडून कुर्ल्यात एलबीएस रोडवरील (Kurla lbs road) तीन एकर जागा विकत घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. "ही जमीन सॉलिडस प्रायव्हेट लिमिटेड नावाने रजिस्टर झालेली आहे. ही सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे" असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांची नावे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

"मुंबईचे मारेकरी, बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून नवाब मलिक यांनी जमीन का विकत घेतली? सलिम पटेल कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का?" असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. "या लोकांवर टाडा आहे. ज्या लोकांवर टाडा असतो, त्यांची प्रॉपर्टी सरकार जप्त करते. टाडाच्या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये, म्हणून तुम्हाला ट्रान्फरस केली का ?" असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

"मुंबईचे चिथडे उ़डवणारे, आरडीएक्स भरणारे, कारस्थान रचणारे अशा व्यक्तींसोबत तुम्ही व्यवसाय करता. अशी एकूण पाच संपती आहेत, ज्यात चारमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे" असा दावा फडणवीस यांनी केला. "हे सर्व पुरावे मी यंत्रणेला देईन. ते चौकशी करतील. हे सर्व पुरावे मी शरद पवारांना पाठवून देणार आहे. त्यांनाही समजूंदे त्यांच्या मंत्र्यांनी काय रंग उधळलेत, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT