मुंबई

टॉसिलीझुमॅबचा औषधाच्या वापराबाबत राज्य टास्क फोर्सचे रूग्णालयांना निर्देश; अपेक्षित परिणाम साधत नसल्याचे स्पष्ट

मिलिंद तांबे


मुंबई  - कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या टॉसिलीझुमॅब इंजेक्शनमुळे मृत्यूदर कमी होत नाही तसेच या औषधामुळे कोरोना बाधित रूग्णाला फारसा उपयोग होत नसल्याचे उत्पादक कंपनीने स्पष्ट केले. यानंतर राज्य टास्क फोर्स ने या औषधा संबंधी नवे निर्देश जारी केले आहेत. कोरोना बाधित रूग्णांवर सरसकट औषध न वापरता केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
टॉसिलीझुमॅब इंजेक्शनच्या वापराबाबात राज्य टास्क फोर्सने नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार हे औषध आता केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरता येणार आहे. शिवाय हे औषध वारंवार न वापरता केवळ एकदाच वापरता येणार आहे अशी माहिती राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिली.

रेमेडेसिवीर,हायड्रोक्लोरोक्वीन,टॉसिलीझुमॅब यासारखी काही औषधं कोरोना बाधिक रूग्णांच्या उपचारासाठी वापरली जातात.मात्र यातील टॉसिलीझुमॅब इंजेक्शसनचा अपेक्षित परिणाम साधत नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत या औषधाची निर्मिती करणा-या कंपनीने पत्रक काढून या औषधाची निर्मीती बंद करत असल्याचे सांगितले.  
या औषधाच्या परिणाम जाणून घेण्यासाठी क्लीनिकल ट्रायल करण्यात आले.त्यात गंभीर रूग्णांवर या औषधाचा नेमका काय परिणाम होतो याचे निरिक्षण कऱण्यात आले. औषधाचा फायदा मृत्यूदर कमी करण्यासाठी कितपत होतो याचा ही अंदाज घेण्यात आला,याशिवाय बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांचा ही अभ्यास कऱण्यात आला.त्यात या औषधाचे अपेक्षित परिणाम दिसले नाहीत त्यामुळे या औषधाचा वापर कमी कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या या औषधाचा संपूर्ण राज्यात तुटवडा जाणवतोय. हे औषध सध्या कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे या औषधाबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य टास्क फोर्सला दिले आहेत. मुंबई बाहेरील अनेक रूग्णालयांत रूग्णांसाठी हे औषधं मागवलं जात आहे मात्र या औषधाचा तुटवडा असल्याने नातेवाईकांची फरफट होत आहे. 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ तात्याराव लहाने यांनी याबाबत बोलतांना सांगितले की,हे औषध काळजीपूर्वक वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या हे एकच इंजेक्शन वापरण्यास सांगण्यात आले आहे. रूग्णाला अधिक इंजेक्शनची गरज असल्यास इटीलोझुमॅब हे इंजेक्शन वापरता येणार असल्याचे ही लहाने पुढे म्हणाले.     

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT