मुंबई : जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना आजाराला हरवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातायत. विविध प्रकारची औषधं शोधली जातायत, लस शोधली जातेय. अशात विविध डॉक्टर्सकडून वेगवेगळ्या थेरीपीवर देखील संशोधन केलं जातंय.
मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स या रुग्णालयातील तज्ज्ञांनी देखील अतिशय महत्त्वाचा अभ्यास केलाय. या अभ्यासाअंती वाफेमुळे नाक आणि घशातील संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे मानद कन्सल्टंट डॉ. दिलीप पवार, डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ, रुग्णालयाच्या डॉ. स्मिता चव्हाण, साहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षलकुमार महाजन, डाटा संशोधक सीमांतीनी भल्ला आणि लेझर शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. रुसी भल्ला या टीमने हा अभ्यास केलाय.
संशीधनाची प्रक्रिया काय होती ?
याबाबत माहिती देताना सेव्हन हिल्सचे डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ म्हणतात, वाफ घेणं ही कोरोनावरील शास्त्रीय उपचार पद्धती नाही. मात्र कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार सुरु असताना 'स्टीम थेरेपी' ही अत्यंत उपयुक्त सहाय्य्क उपचार पद्धती आहे. तज्ज्ञांच्या टीमने यावर अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय आणि वाफेमुळे कोरोनाच नव्हे तर इतर संसर्गजन्य आजारही कमी होऊ शकतात असं निरीक्षणाअंती समोर आलंय.
स्टीम थेरेपीनंतर ही होती अभ्यासाची निरीक्षणे :
steam therapy is helpful to reduce covid 19 infection in throat and mouth
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.