मुंबई

कोरोनाच्या सुरुवातीला झालेली चूक टाळण्यासाठी पालिकेकडून सक्तीचे निर्णय

समीर सुर्वे

मुंबई: इंग्लंडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने सक्त पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या चुका हे मुख्य कारण आहे. 1 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. यातून धडा घेत आता नव्या कोविडशी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा ॲक्शनमोड मध्ये आल्या आहेत.

फेब्रुवारी मार्च काळात परदेशातून 2 लाख प्रवासी मुंबईत आले. त्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला.त्यामुळे आता खबरदारी घेत आहोत, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

मुंबईसह भारतातील सर्व विमानतळावर 18 जानेवारीपासून चीन तसेच त्या परिसरातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत होती. त्यात टप्प्याटप्प्याने काही देशांची संख्या वाढविण्यात आली. मात्र 9 मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटूंब आखाती देशातून आले होते. तर मुंबईत आढळेला पहिला रुग्णही याच प्रवाशां बरोबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र परवानगी देण्यात आली. तसेच काही परदेशातून आलेल्या देशातील इतर विमानतळांवर उतरून मुंबईतील आंतरदेशी विमानतळावर येत होते. सुरुवातीला आंतरदेशी विमानतळावरही प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात नव्हते.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Strict decision bmc avoid mistake made beginning of the corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT