डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी एमएमआरडीए व एमएसआरडीसी मार्फत भरघोस निधी मंजुर करुन घेत विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग देखील मागे नाही. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी 1 हजार 154 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून सर्वपक्षीय आमदारांनी रस्ते व पुलांची कामे सुरु केली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वात जास्त निधी मिळवत आघाडी घेतली असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल भाजपचे किसन कथोरे यांनी आपली वर्णी लावली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या निधीवरुन ओरड सुरु केली होती. शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडून पुरेसा निधी दिला जात नाही, विकास कामांचे श्रेय लाटले जाते अशा सातत्याने तक्रारी भाजपच्या लोक प्रतिनिधींकडून केला जात होता. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाले, महायुतीचे सरकार आता स्थापन झाले आहे.
महायुती सरकारच्या काळात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी आमदार चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत आपण जिल्ह्यासाठी काय योगदान दिले आहे याची माहिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे जिल्ह्यासाठी गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत सुमारे 1 हजार 154 कोटींच्या निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना हा निधी दिला गेला असून निधी देताना कोठेही पक्षपात केला नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यासाठी एमएमआरडीए व एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी खुद मंजुर करुन दिला आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग देखील कोठे मागे नाही असेच विभागाचे मंत्री चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. यापूर्वी या विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खांद्यावर होती. चव्हाण हे शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. आगामी निवडणूका आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्यासाठी किती योगदान दिले आहे. 2022 - 23 व 2023 - 24 या वित्तीय वर्षामध्ये मंजुर कामाचा घोषवारा त्यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात समाविष्ट रस्ते व पुलांची मंजुर कामे व त्यासाठी देण्यात आलेला निधी याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 1 हजार 154 कोटी रुपयांचा विकास निधीतून कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यामध्ये भिवंडी ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी सर्वाधिक निधी मंंजुर करुन घेत आघाडी घेतली आहे. 290 कोटी रुपये विकास निधीतून त्यांच्या प्रभागात कामे सुरु आहेत. तसेच भाजपाचे किसन कथोरे यांनी 287 कोटी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौलत दरोडा यांना 227 कोटी, मनसेचे आमदार राजू पाटील यांना 127 कोटी, कुमार आयलानी 92, महेश चौघुले 42, गणपत गायकवाड यांना 62 कोटी, शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर यांना 27 कोटी निधी विकास कामांसाठी मंजुर करण्यात आले आहेत. या सर्व कोट्यावधी रुपयांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरु आहेत.
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे सर्व रस्त्यांना विभागाकडून भरघोस निधी देण्यात आलेला आहे. ठाणे जिल्हा व माझ्या मतदारसंघाला या सरकारच्या माध्यमातून काय मिळालं हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. ठाणे जिल्ह्यात असा कोणताच भाग नाही की ज्या भागात विकासात्मक कामाला निधी दिला नाही. 03, 04, नाबार्ड, रस्ते पूल, विशेष दुरुस्ती अशा सर्व रस्त्यांच्या कामासाठी लागणारा सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. या भागातील रस्ते दर्जेदार होतील यात काही शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळाली असून कामांना गती देणारे हे सरकार आहे. त्यामुळे राज्यभरात विकासात्मक कामाला निधी देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून झाले आहे.
रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्री
विधानसभा मतदार संघ आमदार विकास कामे निधी (कोटींत)
डोंबिवली रवींद्र चव्हाण 12 92.30
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर 4 27
कल्याण पूर्व गणपत गायकवाड 19 62
कल्याण ग्रामीण प्रमोद (राजू) पाटील 19 37
उल्हासनगर कुमार आयलानी 6 92
मुरबाड किसन कथोरे 113 293
भिवंडी पश्चिम महेश चौघुले 16 42
भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे 125 288.47
शहापूर दौलत दरोडा 252 227
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.