Sudhir More suicide case: विक्रोळी (पश्चिम) येथे राहणारे शिवसेना (उद्धव गट) नेते माजी नगरसेवर सुधीर मोरे यांचा मृतदेह विद्याविहार-घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळावर आढळल्याने खळबळ उडाली होती. शासकीय रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ (abetment of suicide) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
एक महिला सुधीर मोरे यांना दोन महिन्यांपासून ब्लॅकमेल करत होती. मोरे हे गुरुवारी रात्री अकरा वाजता खासगी बैठक असल्याचे सांगून अंगरक्षकाशिवाय घराबाहेर पडले होते. गुरुवारी (३१ ऑगस्ट) घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान रेल्वेसमोर उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी सुधीर मोरे यांच्या मोबाईलवर एका महिलेने ५६ कॉल केले होते. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सुधीर मोरे यांना महिलेने मानसिक त्रास दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
दरम्यान सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांच्या वतीने धक्कादायक माहिती न्यायालयात दिली आहे. इक्बाल सोलकर म्हणाले, महिलेने सुधीर मोरे यांना माझ्याशी संबंध ठेव नाहीतर जीवन संपवून टाकू,अशी धमकी दिली होती.
इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी महिला आणि सुधीर मोरे यांच्यात ५६ वेळा कॉलवर बोलणे झाले. याशिवाय यांच्यात व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल देखील करण्यात आले होते. कुर्ला पोलिसांनी असा दावा केला आहे.
मोरे यांनी महिलेला छळ थांबवण्याची विनंती केली होती. मात्र महिलेने कोणतीही दयामाया दाखवली नाही, अशी बाजू सरकारी वकीलांनी न्यायालयात मांडली, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.