Sunil Tatkare sakal
मुंबई

Sunil Tatkare: राष्ट्रवादीच्या सत्कार सोहळ्यास एकमेव खासदार तटकरे आलेच नाहीत, कार्यकर्त्यांचा हिरमोड

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivli: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजित पवार गटाच्या वतीने पक्षाचे एकमेव खासदार सुनील तटकरे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयानंतर जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते.

एकमेव खासदाराच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली. स्वागतासाठी दुर्गाडी येथे उभे देखील राहिले, मात्र खासदार आलेच नाहीत. एक दीड तास वाट पाहिल्यानंतर हिरमुसून कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी आले. वैयक्तिक कारणामुळे खासदार तटकरे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती आहे. मात्र त्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघातील विजयी उमेदवार खासदार डॉ. शिंदे यांचा सत्कार कार्यकर्त्यांनी उत्साहाने केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघात हट्रिक साधत सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा रविवारी कल्याण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे एकमेव निवडून आलेले खासदार सुनील तटकरे मात्र अनुपस्थित असल्याने त्याचीच चर्चा या कार्यक्रमात रंगली होती. तटकरे न आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे रविवारी नवनिर्वाचित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार सुनील तटकरे यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुती पक्षातील शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे, प्रमोद हिंदुराव, भाजपचे नाना सूर्यवंशी, नरेंद्र पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार तटकरे यांच्या स्वागतासाठी सकाळी 9.30 वाजल्यापासून कार्यकर्ते दुर्गाडी येथे जमले होते. 11 वाजेपर्यंत वाट पहिल्यानंतर तटकरे येत नसल्याची माहिती कार्यकर्त्याना मिळताच त्यांचा हिरमोड झाला. तटकरे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आजारी असल्याने ते येऊ शकत नसल्याची माहिती कार्यकर्त्याना देण्यात आली.

याविषयी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे एकमेव खासदार तसेच प्रदेशचे नेते हे सुनील तटकरे असून त्यांचाही येथे जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता. परंतु त्यांचे निकटवर्ती असलेले कार्यकर्ते हे अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णालयात ऍडमिट आहेत. कार्यकर्त्यांच्या कामाची जाण तटकरे यांना आहे. आणि ती जाण ठेवूनच ते येथील विजयी सोहळ्याला आले नाहीत.

कार्यकर्त्यांना कसे पुढे घेऊन जावे याचे उत्तम उदाहरण तटकरे यांनी आज दाखवून दिले. सत्कारापेक्षा कार्यकर्त्याची सेवा ही मोठी आहे. आणि आम्ही कार्यकर्त्यांनाही त्याची जाण आहे. महायुती मधील कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार झाला, याचा आम्हाला आनंद आहे असे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT