मुंबई : गेले काही दिवस मुंबई आणि महाराष्ट्र्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुशांत सिंह राजापूत प्रकरण चांगलंच गाजतंय. सुशांतच्या मृत्यूनंतर आता जो तपास सुरु आहे त्यामध्ये सुशांतच्या मृत्यूसोबत आर्थिक गैरव्यवहार आणि ड्रग्सचं देखील कनेक्शन तपासलं जातंय. रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि त्यांच्या इतर साथीदारांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. रिया, शोविक आणि इतर सर्वांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलीये. याप्रकरणी जसजशी चौकशी होतेय तसतशी अनेक बड्या कलाकारांची नावं समोर येतायत. या प्रकरणी आता दीपिका आणि दिया मिर्झा यांची नावं देखील समोर येताना टीव्ही बातम्यांमधून समजतंय.
महत्त्वाची बातमी - शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार
शरद पवार याबद्दल काय म्हणालेत ?
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडून पास करण्यात आलेले कृषी विधेयक, शरद पवारांना आलेली आयकर विभागाची नोटीस, मराठा आरक्षण आणि सुशांत सिंह प्रकरणावरही भाष्य केलंय.
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास सुरु असताना आता अनेक बड्या कलाकारांची नवे समोर येतायत. याबाबत शरद पवारांना विचारणा करण्यात आलेली. यावर शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं. आत्महत्या कुणाचीही असो त्याबाबत दुःख होतंच. मात्र आज, दिवसाला १० ते पंधरा आणि महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत असतात देशात गेले तीन महिने या आत्महत्येवरून गंभीर चर्चा सुरु आहे. शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही. सुशांत प्रकरणाबाबत मला माहीत नाही, मी त्याकडे लक्ष देत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
sushant singh rajaput death case involvement of rhea and reaction of sharad pawar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.