मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं लागण्याची शक्यता आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं मोठा खुलासा केला आहे. शेजाऱ्यांनी सांगितलेली माहिती पुढील तपासासाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं जातंय. सुशांतच्या घरी १३ जूनला एक पार्टी झाल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात आला. मात्र, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार १३ जूनला सुशांतच्या घरातील लाईट लवकर बंद झाल्या होत्या. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या. तसेच त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, अशी माहिती या महिलेनं दिली आहे.
या शेजारी राहणाऱ्या महिलेनं सांगितलं की, १३ जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नाही. या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड आहे. त्या रात्री साडेदहा पावणेअकरा वाजल्याच्या सुमारासच बंद करण्यात आल्या होत्या. केवळ किचनमधील लाईट सुरु होती. त्याच्या घरात इतक्या लवकर अशा पद्धतीने लाईट बंद होत नसे. तो उशिरापर्यंत जागा असायचा. मात्र, त्या दिवशी माध्यमांमध्ये जसं सांगितलं जात आहे की पार्टी होती, तशी कोणतीही पार्टी नव्हती.
या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या दिवशी लाइट लवकर का बंद झाल्या ही संशयास्पद गोष्ट असल्याचंही तिनं नमूद केलं. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नाही, अशी माहिती दिली आहे.
सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयला मिळालं आहेत. हे फुटेज आता फॉरेन्सिक टीमला पाठवले जातील आणि नंतर त्याचा योग्य तो तपास केला जाईल. तसेच या फुटेजशी कोणी छेडछाड केली आहे का याचाही शोध घेण्याचा फॉरेन्सिक टीम प्रयत्न करणार असल्याचं समजतंय.
Sushant Singh Rajput neighbour claimed no party at house night before his death
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.