Sushma Andhare slam devendra fadnavis  sakal
मुंबई

Sushma Andhare : "सरडा सुद्धा आत्महत्या करेल हो"; नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून अजितदादांच्या सत्ताधारी गटात गेले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूनं सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. त्यावरुन फडणवीसांना विरोधकांवर टीका करताना मलिक तुरुंगात असताना त्यांना मंत्रिपदावरुन काढणार नाही असं म्हणणारे आम्हाला प्रश्न विचारत आहेत, असं म्हटलं.

यावर आता ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सरड्यालाही लाज वाटेल अशा शब्दांत त्यांनी हे उत्तर दिलं आहे. (Sushma Andharen Jibe at Devendra Fadnavis on issue of Nawab Malik take side of govt)

विधान भवनात काय घडलं?

नवाब मलिक हे अजितदादांसोबत गेल्यानं विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की, सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर त्यांनीच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. पण दानवेंच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष तुरुंगात असताना देखील आम्ही मंत्रिपदावरुन काढणार नाही ते आता इथं भूमिका मांडत आहेत. (Latest Marathi News)

...तर मंत्रिपदावरुन का काढलं नाही

आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. त्यानंतर अजितदादा आमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला भुजबळ बसले आहेत. त्यामुळं तुम्ही आमची काळजी करु नका.

सर्वात आधी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतरही ते तुरुंगात असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरुन का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या नंतर आम्हाला प्रश्न विचारा. फडणवीसांच्या या उत्तरानंतर सभागृहात गोंधळ पहायला मिळाला. (Marathi Tajya Batmya)

अंधारेंनी फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, एका तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपनं केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतलं आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचं मंत्रिपद का काढून घेतलं नव्हतं असा प्रश्न विचारतात? फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT