Uddhav Thackeray Receives Explosive Letter from Swapna Patkar esakal
मुंबई

Uddhav Thackeray: "संजय राऊत माझा पाठलाग करत होते, तुम्ही काय कराल?" ; उद्धव ठाकरेंना लाडक्या बहिणीचे पत्र, राजकारणात खळबळ

Swapna Patkar’s Explosive Letter to Uddhav Thackeray Sparks Controversy: स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे राजकारणातील नैतिकता आणि नीतिमत्ता याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. महिला सुरक्षितता आणि त्यांच्या न्यायाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sandip Kapde

Maharashtra Politics in Turmoil Over Harassment Allegations Against Sanjay Raut

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मानसशास्त्रज्ञ स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर धमकी आणि छळ केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात पाटकर यांनी राऊत यांच्या विरोधात आयपीसी कलम ५०९, ५०६ आणि ५०४ अंतर्गत एफआयआर देखील दाखल केला होता.

स्वप्ना पाटकर मुंबईतील सांताक्रूझ भागात राहतात. मानसशास्त्रज्ञ आहे. त्या मुंबईत स्वतःचे क्लिनिक चालवतात. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे. स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र  लिहले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्ना पाटकर यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, "महिला सुरक्षिततेबद्दल तुमच्या वक्तव्यांबद्दल आनंद झाला. परंतु, संजय राऊत यांच्याकडून मला झालेल्या छळाची माहिती तुम्हाला वारंवार दिली होती. तरीही तुम्ही त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. मी 2016 ते 2021 या कालावधीत तुम्हाला अनेक ईमेल लिहिले होते, ज्यात मी राऊत यांच्या धमक्या आणि पाठलाग करण्याच्या घटनांची माहिती दिली होती."

स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या पत्रात असेही नमूद केले की, "माझ्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे मला वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. माझे काम बंद करण्यात आले. माझा चित्रपट 'डॉक्टर रखमाबाई' रिलीज होऊ दिला नाही, ज्यामुळे माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान झाले."

संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, "राऊत यांनी मला शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि माझ्या कामात अडथळा आणला. त्यांनी माझ्या विरोधात असलेल्या लोकांच्या मदतीने माझ्या जीवनाचा नाश करण्याचा प्रयत्न केला."

उद्धव ठाकरे यांना विचारलेला प्रश्न

स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले की, "तुम्ही आता बहिणीसाठी लढायला तयार आहात. परंतु, माझ्या बाबतीत तुम्ही काय कराल? महाराष्ट्राला या प्रश्नाचे उत्तर द्या. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे."

महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद

स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याविरुद्धचे हे आरोप कितपत खरे आहेत, हे तपासात समोर येईल.

स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे राजकारणातील नैतिकता आणि नीतिमत्ता याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. महिला सुरक्षितता आणि त्यांच्या न्यायाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT