मुंबई : बँकॉकहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवाशाकडून एअर होस्टेसच्या विनयभंगाची घटना घडल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमान मुंबईत लँड होताच पोलिसांनी संबंधित प्रवासाला अटक केली आहे. (Swedish National Arrested In Mumbai For Allegedly Molesting IndiGo Staff)
एएनआयच्या माहितीनुसार, बँकॉक ते मुंबई या फ्लाईटमध्ये गुरुवारी एका ६३ वर्षीय स्विडिश व्यक्तीनं २४ वर्षीय एअर होस्टेसचा विनयभंग केला. क्लास एरिक हराल्ड जोनस वेस्टबर्ग असं या आरोपीचं नाव असून विमानात जेवण सर्व करताना हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडित एअर होस्टेसनं पोलिसांत जी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार, वेस्टबर्ग हे विमानात बसला तेव्हा दारु प्यायलेला होता, त्याला सीफूड खायचं होतं पण विमानात उपलब्ध नसल्यानं मी त्याला चिकन सर्व्ह केलं तसेच त्याला पीओएसवर पेमेंट करण्यासाठी एटीएम कार्ड मागितलं. याचवेळी कार्ड स्वाईप करताना आरोपीनं एअर होस्टेसचा हात पकडला. हात झटकून दूर केल्यानंतर तिनं त्याला एटीएमचा पिन टाकण्याची विनंती केली.
मात्र, यावेळी त्यानं हद्दच केली. तो सरळ उभा राहिला आणि त्यानं संबंधित एअर होस्टेसचा इतर प्रवाशांसमोर विनयभंग केला. त्यानंतर तिनं आरडाओरडा केला तसेच त्यानं गैरवर्तन केल्याचं सांगितलं, त्यानंतर हा प्रवाशी आपल्या जागेवर बसला.
दरम्यान, आरोपीच्या वकिलानं सांगितलं की, तो आजारी होता त्यामुळं त्याचं शरीर थरथरत होतं. कोणतीही वस्तू तो आधाराशिवाय पकडू शकत नव्हता. त्यानं पीओएस पेमेंटचं मशिन हातात पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी त्याचा एअर होस्टेसच्या हाताला स्पर्श झाला. त्यानं हेतूपूर्वक तिला स्पर्श केला नव्हता.
विमानात अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण वाढलं असून गेल्या तीन महिन्यांत अशा घटनांसाठी ८ प्रवाशांना भारतात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.