mumbai sakal
मुंबई

परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार

पोलिस महासंचालकांची कारवाईची शिफारस

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणी मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यात, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांनी राज्याच्या गृहविभागाकडे केली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. यावर गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत माहिती मागविण्यात आली असून त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

अहवालात चार पोलिस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अकोला पोलिस दलातील पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची खुली चौकशी करण्याची विनंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. हा गुन्हा ठाणे शहरात घडल्याने त्याचा तपास नंतर ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर मुंबईसह ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यांच्यासह इतर पोलिसांवरही खंडणीसह भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिसांवर मुंबईसह ठाणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वेगवेगळे गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व गुन्ह्यांची पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित पोलिसांवर निलंबनाची शिफारस करण्याची विनंती गृहविभागाकडे केली आहे. त्यावर या पोलिस अधिकाऱ्यांची खंडणीसह भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत नेमकी काय भूमिका होती,त्यांचा कुठपर्यंत सहभाग होता याबाबतची माहिती गृह विभागाने मागविली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT