मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून आलेलं कोरोनाचं संकट कमी होण्याचं नाव नाहीये. देशात कोरोना रुग्णसंख्या जरी वाढत असली तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर तुलनेने कमी आहे. शिवाय, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आता हळूहळू होतेय. मात्र, हे प्रमाण आणखी कमी व्हावं आणि रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी कर्करोगांवर उपचार करणाऱ्या टाटा रुग्णालयाकडून कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील झेवियर्स ग्राउंडमध्ये फिव्हर ओपीडी आणि कोविड 19 च्या रुग्णांची तपासणी केली जाणार असुन इथे Swab आणि एक्स-रे ची सुविधा दिली जाणार आहे.
मोठी बातमी - दरवर्षी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करतात? आधी विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ...
लॉकडाउन हळूहळू शिथिल केला गेल्यामुळे रूग्णालयात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे फिव्हर ओपीडी चालवण्यासाठी आणि कोविड -19 रूग्णांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर झेविअर्स मैदानावर एक तात्पुरती सुविधा तयार केली गेलीये. इथे कोविड -19 रूग्णांची तपासणी करण्याची तसेच फिव्हर ओपीडी चालवण्याची योजना आखली गेली. या ग्राउंडमध्ये अहवाल येईपर्यंत प्रतिक्षेत असणाऱ्या रुग्णांसाठी एक प्रतिक्षालय देखील असणार आहे. यामुळे, कर्करोग आणि कोविडग्रस्त रूग्णांचे निदान, चाचणी आणि उपचारच नव्हे तर सोशल डीस्टस्टींग, मास्क आणि हाताची स्वच्छता यासारख्या सावधगिरी बाळगणाऱ्या गोष्टींचा प्रसार करण्यास देखील मदत होणार आहे.
मोठी बातमी - सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?
टाटा मेमोरियल सेंटरने मार्च 2020 मध्ये कोविड 19 च्या रुग्णांसाठी कोविड केंद्र सुरु केले. तेव्हापासून आतापर्यंत कर्करोग आणि कोविड हे आजार असलेल्या 600 हून अधिक रुग्णांवर उपचार केलेत. मुंबईच्या अनेक रुग्णालयांमधून रुग्णांची गरज भागवण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कर्करोग आणि कोविड19 च्या रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन कॅन्सर वॉर्डचे कोविड वॉर्डमध्ये रूपांतर केलंय. या व्यतिरिक्त, एनएससीआय डोम कोरोना केअर सेंटर आणि विक्रोळीच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये जवळपास 60 रूग्णांवर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचार्यांनी कर्करोग आणि कोविडच्या रुग्णांवर उपचार केले. त्यानूसार, आता टाटा रुग्णालयाने आजपासुन कोविड ओपीडीही सेवा सुरु केली आहे.
झेवियर्सच्या सुविधेशिवाय परळच्या इंडियन कॅन्सर सोसायटीच्या इमारतीत कोविड 19 आणि कर्करोगाच्या रूग्णांसाठी एक समर्पित वॉर्ड तयार केला जात असल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले आहे.
( संकलन - सुमित बागुल )
tata memorial hospital starts their covid opd for checking covid 19 patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.