मुंबई :प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठ प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात रामभक्त विविध मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने सोमवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे राम भक्तांचे पुरते हाल झाले आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सोमावरी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी तर केंद्र सरकराने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. मात्र, मुंबई आणि उपनगरातील खासगी कार्यालये सुरु होते. तरीदेखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने दोन्ही मार्गावर अंदाजित ५०० लोकल फेऱ्या रद्द होत्या. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.याशिवाय अयोध्याधाममध्ये श्री.राममंदिर पुनर्प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्य मुंबईतील विविध मंदिरात महाआरती ठेवण्यात आली होती, तसेच प्रभू रामाचे देखावेत आणि मिरवणुका काढण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रामभक्त सुट्टी असल्याने विविध मंदिराचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, रविवार वेळापत्रकामुळे लोकल गर्दीचा त्यांना सामना करावा लागला आहे.
एसी लोकलमध्ये बिघाड -
पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकात सोमवारी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास घडल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा खोळंबली होती. त्यामुळे लोकल सेवा एका मागे एक उभ्या होत्या.त्यामुळे चर्चेगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, जलद गाड्या धिम्या मार्गावरुन वळविण्यात आल्या होत्या.त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक देखील कोलमडले होते. त्यामुळे प्रवाशांसह राम भक्तांचे मोठे हाल झाले आहे.
-५०० फेऱ्या कमी
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ,हार्बर मार्ग,ट्रान्स हार्बर मार्गावर मंगळवारी रविवार वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार मध्य़ रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर दिवसभऱात एक १८१० फेऱ्या होतात. पश्चिम दिवसभरात १३१० पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यामुळे रविवार वेळापत्रकामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अंदाजित ४५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.