technical failure mumbai local train wrong station  sakal
मुंबई

Mumbai Local Train : लोकल, प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटर,उद्घोषणा कोमात; प्रवाशांचा गोंधळ !

मुंबईकरांना लोकल प्रवासात कधी गर्दीचा सामना तर, कधी तांत्रिक बिघाडाचा फटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घडल्याचा काट्यावर धावणारे मुंबईकरांना दररोज लोकल प्रवासात अनेक समस्यांना समोर जावे लागतात. त्यातच त्यात लोकल गाड्यात इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दर्शवितात तर कुठे बंद अवस्थते असल्याने मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून हैराण झाले. त्यामुळे लोकल पकडताना प्रवाशांमध्ये गोधळ उडत असल्याचे चित्र आहेत.

मध्य -पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज तीन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्यातून साधरणतः ७५ लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. दररोज मुंबईकरांना लोकल प्रवासात कधी गर्दीचा सामना तर, कधी तांत्रिक बिघाडाचा फटका बसतोय. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दर्शवित असल्याचे प्रकार वाढले आहे.

याशिवाय लोकल मध्ये इंडिकेटर बंद अवस्थेत असल्याने प्रवास करताना प्रवाशांची तारांबळ उडते तर काही वेळा लोकल सुटल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर इंडिकेटर येणारी लोकल अंबरनाथ दाखवतात.

त्यानंतर लोकल ठाणे, कल्याण येत असल्याने प्रवाशांमध्ये चढताना गोधळ उडतोय. या संदर्भात अनेकांनी तक्रारी केल्यानंतर रेल्वेकडून लक्ष दिल्या जात नसल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

पुढील स्थानक कोणते?

पुढील स्थानक कोणते? ते कोणत्या दिशेला येणार? याबाबत लोकलमध्येच माहिती देणारे इंडिकेटर असलेल्या बंबार्डिअर लोकलचा मुंबई रेल्वे ताफ्यात समावेश करण्यात आला. मात्र सद्यस्थितीत अनेक लोकलमधील इंडिकेटर सुस्थितीत नसल्याने ही सुविधा प्रवाशांसाठी असुविधा ठरत आहे.

इंडिकेटर बंद असणे, इंडिकेटरवर पुढील स्थानक चुकीचे दाखवणे, काही वेळा इंडिकेटर अर्धवट सुरू असणे असे प्रकार रोजचेच आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात -

चुकीच्या उद्घोषणा, इंडिकेटवर चुकीची स्थानक आणि लोकल दाखवत असल्याने अनेकदा प्रवाशांमध्ये गोधळ उडतोय. या गोधळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवासी धावत्या ट्रेनमधून उड्या मारतात. रेल्वेने इंडिकेटरची नियमिपणे देखभाल दुरुस्ती करायला हवीत.अन्यथा मोठी जीवित हानी होऊ शकते. रेल्वेने उद्घोषणा आणि इंडिकेटर प्रणाली अपग्रेट करण्याची गरज असल्याची माहिती प्रवासी संघटनेने सकाळला दिली आहे.

रेल्वे देणार लक्ष-

इंडिकेटर आणि उद्घोषणांतील दोष कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहे. रेल्वेने उद्घोषणा आणि इंडिकेटर प्रणाली अपग्रेट करण्यावर विचार सुरु आहे. यांसंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

प्लॅटफॉर्मवर असलेल्या इंडिकेटर आणि स्थानकांतील उद्घोषणानुसार दररोज लोकल पकडतोय. अनेकदा प्लॅटफॉर्मवर होणारी उद्घोषणा आणि इंडिकेटर दाखवलेली लोकल येत नसून दुसरी लोकल येत असल्याने अनेकदा माझा गोधळ उडतोय. रेल्वेने याकडे लक्ष द्यायला हवेत.

- प्रफुल गजभिये, विक्रोळी

स्थानक आणि लोकलमध्ये इंडिकेटर दर्शविणारे लोकल - उद्घोषणा चुकीचा होत असल्याचे प्रकार वाढले आहे. अनेकदा यांसंदर्भात आम्ही रेल्वेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, आतापर्यत हे प्रकार थांबले नाही. रेल्वेने इंडिकेटर आणि उद्घोषणेची प्रणाली अपडेट करण्याची गजर आहे.

- सुभाष गुप्ता,अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT