cvigil mobile app sakal
मुंबई

Election Commission Apps : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य; मतदारांच्या हाती अत्याधुनिक अ‍ॅप्स

निवडणूक जिंकण्यासाठी अनेकदा उमेदवार गैरमार्गाचा वापर करतात किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करतात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - निवडणूक आयोग तंत्रस्नेही उपाययोजना राबवत आहे. यानुसार आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल, तर मतदारांना त्याची तक्रार नोंदवता यावी आणि उमेदवारांनाही प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडता यावेत, म्हणून आयोगाने मतदार आणि उमेदवारांच्या हाती अत्याधुनिक सहा ॲप दिले आहेत.

सी-व्हिजिलचे अस्त्र

निवडणूक जिंकण्यासाठी अनेकदा उमेदवार गैरमार्गाचा वापर करतात किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करतात. त्यावर वॉच ठेवता यावा, सहजपणे तक्रार नोंदवता यावी म्हणून सी व्हिजिल मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. त्याआधारे नागरिकांना सहजपणे एखाद्या घटनेचे चित्रीकरण, छायाचित्र काढून निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवता येते.

1) याप्रकरणी सी व्हिजिल अ‍ॅपवर आलेली तक्रार अवघ्या १०० मिनिटात नोंदवून घेत त्याची माहिती तक्रारदाराला दिली जाते.

2) तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.

3) आचारसंहिता उल्लंघनाचे ठिकाण शोधण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर करून तातडीने कारवाई केली जाते.

वोटर टर्नआऊट

मतदान सुरू असताना किती टक्के मतदान झाले याची प्रत्येक दोन तासाची आकडेवारी वोटर टर्नआऊट अ‍ॅपच्या माध्यमातून मिळत आहे. राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती मिळत असल्याने त्याचे विश्‍लेषण करणे सोपे जाते. तसेच हवी असलेली आकडेवारी या अ‍ॅपच्या माध्यमातून फिल्टर करता येत.

वोटर हेल्पलाईन अ‍ॅप

वोटर हेल्पलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून देशातील मतदारांना सेवा आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे या अ‍ॅपचे उद्दिष्ट आहे. तसेच नागरिक या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाशी कनेक्ट राहू शकतात.

  • मतदार यादीत नाव शोधणे

  • नवीन नोंदणीसाठी अर्ज करणे

  • मतदार यादीतील नाव हटवणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे

  • मतदान, ईव्हीएम, निकालाबाबत असलेल्या शंका विचारणे

  • उमेदवाराचे शिक्षण, पात्रता, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे आदी माहिती मिळवता येते

  • निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो.

केवायसी अ‍ॅप

मतदारांना केवायसी ईसीआय अ‍ॅप म्हणजे नो युवर कॅण्डीडेट. यामध्ये आपल्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा असलेला उमेदवार कोण आहे, त्याचे नाव, गाव, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे, शिक्षण आदी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होतो. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने मतदारांच्या शंका निरसनसाठी १९५० ही हेल्पलाईन सुरू केली आहे.

सुविधा अ‍ॅप

सुविधा अ‍ॅप हे निवडणूक काळात उमेदवारांना नामनिर्देशनाबरोबरच वेगवेगळ्या परवानग्या देण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानुसार उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी निवडणूक कार्यालयात फेऱ्या न मारता या अ‍ॅपच्या माध्यमातून सहजपणे परवान्यासाठी अर्ज करता येतो, त्याची स्थिती जाणून घेता येते.

1) सुविधा अ‍ॅपमुळे उमेदवाराची वेळेची आणि खर्चाची बचत होत आहे.

2) एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या काढता येतात.

सक्षम अ‍ॅप

सक्षम अ‍ॅपच्या माध्यमातून दिव्यांग मतदाराला सर्व सुविधा घरी बसून मिळवता येतात. त्यानुसार संबंधिताने या सेवेसाठी नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मतदारसंघ नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक ती मदत अधिकारी उपलब्ध करुन देऊ शकतात. मतदानाच्या दिवशी या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला करणे शक्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT