Viral video Esakal
मुंबई

Viral video: बापाची BMW कार अन् बोनेटवर झोपून स्टंट; मुंबईतील गर्दीच्या भागात अल्पवयीन मुलाचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे पोर्शे कारचा अपघात सध्या देशभरात चर्चेत आहे. आता आणखी एका अल्पवयीन मुलाचा कारसोबत स्टंट केल्याचा व्हिडिओ कल्याण, मुंबईतून समोर आला आहे. अल्पवयीन तरूण बीएमडब्ल्यू कार चालवत आहे आणि त्या कारच्या बोनेटवर दुसरी व्यक्ती झोपली आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक परिसरात अल्पवयीन तरूण हा स्टंट करत आहे, विशेष म्हणजे हा परिसर गर्दीने खचाखच भरलेला आहे. अशा स्थितीत या ठिकाणी अपघाताची शक्यता आणखी वाढते. मात्र असे असूनही तो लोकांच्या खचाखच भरलेल्या रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे.

पुणे पोर्शे अपघाताच्या काही दिवसांनंतर, मुंबईतील एका व्यक्तीला एका चालत्या बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर झोपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. ही कार देखील एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चालवली होती.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, फुटेजमध्ये बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर पडलेल्या व्यक्तीची ओळख सुभम मितालिया असे करण्यात आली आहे, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा मुंबईच्या कल्याण परिसरात शनिवारी शिवाजी चौकाजवळ ही कार चालवत होता.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ परिसरातील स्थानिकांनी चित्रित केला होता आणि पुणे पोर्शे मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग प्रकरणाभोवती सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या व्हिडीओची देखील चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर, या बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर पडलेल्या 21 वर्षीय सुभम मितालियाला अटक करण्यात आली, तर अल्पवयीन चालक आणि त्याचे वडील दोघांवरही संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिकाऱ्यांनी असेही उघड केले की. कारची नोंदणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या नावावर आहे, ते सरकारी नोकरी करतात.

“अल्पवयीन मुलाला वैध चालक परवान्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल त्याच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असेही पोलिसांनी सांगितले.

पुणे पोर्शे प्रकरण

सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ आश्चर्यचकित करणारा आहे, कारण नुकतेच पुण्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या भरधाव कारने दोन जणांचा बळी घेतला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी हा बिल्डरचा मुलगा आहे. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे आणि त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवला जाईल की नाही या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सध्या अल्पवयीन मुलाचे वडील तुरुंगात आहेत.

आरोपीला किरकोळ अटींसह सोडण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले. आरोपीला रस्ते अपघातांवर निबंध लिहून वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले होते.

यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. आता या प्रकरणी पुढील कारवाई अधिक कठोरपणे करण्यात येत आहे. अशी प्रकरणे देशभरात अनेकदा समोर येतात ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यापैकी अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुले वाहने चालवताना आढळतात. रस्त्यावर वाहन चालवणे कमी धोक्याचे नाही, तर अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्याने हे अपघात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक लक्झरी स्पोर्ट्स सेडान - पोर्शे टायकन - कथितपणे 17 वर्षांच्या तरुणाने चालवली होती, जो अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होता, ज्यामध्ये १९मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणी नगर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणात नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये 17 वर्षीय आरोपीने या घटनेच्या रात्री कथित पोर्शे चालवताना दाखवले आहे. अपघाताच्या एक दिवस आधी हा व्हिडिओ कैद करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT