मुंबई : तीस जूनला मणीपूरला जाणारी अखेरची श्रमिक स्पेशल सुटली, त्यावेळी गावी परतण्याची इच्छा असलेले सर्व स्थलांतरीत मजूर आपल्या गावी रवाना झाले अशीच सर्वांची धारणा होती. त्यानंतर आपापल्या राज्यात परतलेल्या मजूरांची मुंबईत पुन्हा कामावर परत येण्यासाठी चढाओढही सुरु झाली. मात्र या लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी जाता न आल्याने मुंबईतच अडकून पडलेले सत्तर श्रमिक मुंबईहून शुक्रवारी रवाना झाले आहेत.
मूळ हजारीबागचे रहिवासी असलेले अली हसन अन्सारी तसेच अन्य सुमारे सत्तर जणांनी अखेरची श्रमिक स्पेशल 30 जूनला मणीपूरला रवाना झाली असल्याचे ऐकल्यावर त्यांनी गावी परतण्याची आशाच सोडली होती. अन्सारी अथवा या श्रमिक स्पेशलने रवाना झालेल्या अनेकांकडे कोव्हिड स्पेशल ट्रेनने गावी परतण्यासाठी पैसे नव्हते तसेच हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या मुंबईत रोजगारही मिळत नव्हता. अन्सारी हे दक्षिण मुंबईतील गोडाऊनमध्ये काम करतात. ते गोडाऊनच त्यांचे घर झाले होते. त्यांच्यासह हजारीबागचे पाच जण तिथेच काम करीत आणि तिथेच रहात असत. ते पाचही जण जानेवारीत मुंबईला आले होते. त्यांना महिन्याला नऊ हजार मिळत होते. पण त्यांचे काम सुरु झाले आणि अडिच महिन्यातच लॉकडाऊन सुरु झाले.
आम्हाला झोपायला गोडाऊन होते. अनेक लोक खायला आणून देत होते. त्यामुळे आम्ही तग धरुन होतो. घरी परतण्यासाठी केलेल्या अर्जाचा उपयोग होत नव्हता. पण अचानक त्यांना गुरुवारी फोन आला. या फोनची ते जवळपास तीन महिने प्रतिक्षा करीत होते. वांद्रे टर्मिनसहून गिरीध (झारखंड) येथे जाणाऱ्या श्रमिक स्पेशल प्रवाशांच्या यादीत त्यांचे नाव असल्याचे कळवण्यात आले. अर्थातच अन्सारी यांच्यासह हजारीबागहून आलेले अन्य पाच जणही गावी परतत आहेत.
लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी गावी जाण्याचा त्यातील अनेकांनी प्रयत्न केला होता, पण रेल्वेमध्ये खूपच गर्दी असल्यामुळे त्यांना प्रवास करता आला नव्हता. खासगी वाहनाने गावी जाणे शक्य नव्हते. तेवढा पैसाही आमच्याकडे नव्हता. गावाला गेलेले अनेक जण परत मुंबईत येत असल्याने अन्सारी गावी जाण्याबाबत फेरविचार करीत होते, पण मालकाने गोडाऊन कधीपासून सुरु होईल याची खात्री न दिल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावी जाण्याचे ठरवले.
---
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.