वाशी : वातावरणातील उष्णता वाढू लागताच थंड पेये, फळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सध्या एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये कलिंगड आणि खरबुजाच्या १५० ते १७० गाड्यांची आवक होत असून दरही आवाक्यात आहेत.
वाढत्या उष्म्यात शरीराचे तापमान संतुलित राहावे यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावेसे वाटते. तसेच रसदार, थंडावा देणारी फळे खावीशी वाटतात. मार्च महिना सुरू होताच कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली आहे. सध्या बाजारात सांगली, सोलापूर, गुलबर्गा येथून कलिंगड, खरबुजाची आवक होत आहे. गडद हिरव्या रंगाची ‘शुगर किंग’ जातीची कलिंगडे चवीला खूपच गोड लागतात. त्यामुळे त्यांना बाजारात दरवर्षी मोठी मागणी असते. तसेच, फिक्कट हिरव्या पट्ट्याची लांबट आणि आकाराने मोठी असणारी नामधारी जातीची कलिंगडही बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. ही कलिंगडे ज्यूस बनविण्यासाठी खास विकली जातात, तर जिरावी कलिंगड लोक घरी खाण्यासाठी जास्त प्रमाणात घेतात. नामधारी कलिंगड आकाराने मोठे असल्याने एक कलिंगड वजनाला पाच ते सहा किलोपर्यंत भरते.
हिरव्या, पिवळ्या रंगाची, आकाराने लहान, मात्र चवीला गोड असलेल्या खरबुजांनाही मोठी मागणी आहे. खरबुजांचेही अनेक प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळतात.
कलिंगडाचे प्रकार - शुगर किंग- नामधारी - जिरावी
घाऊक दर
कलिंगड १० ते १२ रु. किलो
खरबूज २० ते २५ रु. किलो
''यंदा उत्पादन चांगले आले आहे. मागणी वाढली असली तरी दर स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकही कलिंगड, खरबुजाचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. रमझान महिना सुरू होईपर्यंत ही आवक अशीच राहणार असून दरही स्थिर राहतील.''
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.