मुंबई : राज्यात परत एकदा मध्यम थंडीची लाट येण्याची शक्यता असून, 20 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात वाढ झाली आहे. उष्मा वाढला असून, उन्हाची काहिली वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दिल्लीसह उत्तरेकडील पारा प्रचंड घसरला असून, राज्यातील अनेक भागांत शीत लहर येण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकण शीत लहरीमुळे प्रभावित होणार आहे. 22, 23 जानेवारीनंतर पुणे, नाशिकचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होईल. मुंबई परिसरातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
राज्यात बदललेल्या वातावरणाचा काहीसा परिणाम जाणवू लागला असून, पारा घसरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचे किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून गारवा वाढू लागला आहे. राज्यात सगळ्यात कमी तापमान गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर ब्राह्मपुरी येथे 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यभरातील किमान तापमानात येत्या काही दिवसांत आणखी घट होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
आजचे किमान तापमान
The temperature will drop in a few days in state
-------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.