मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं प्रमाण महाराष्ट्र आणि मुंबईतही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर राज्यात मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १६० पार जाऊन पोहोचला आहे. मुंबईच्या वरळी इथल्या कोळीवाड्यात तब्बल १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून आता आणखी जास्त जातेय.
वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे तब्बल १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनानं आणखी खबरदारी घेतली आहे. वरळी कोळीवाड्यातल्या काही रहिवाशांना पोद्दार हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. वरळी कोळीवड्यात रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या १०८ जणांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काल रात्री या १०८ रहिवाशांची यादी तयार केली आहे. या सर्वांना जवळच्या पोद्दार रुग्णालयात नेण्यात आलंय.
दुपारी १.३० वाजता एका बेस्ट बसच्या माध्यमातून वरळी कोळीवड्यातून या नागरिकांना इथून हलवण्याची सोय करण्यात आली. त्या बसमधून टप्प्याटप्प्यानं या रहिवाशांना नेलं गेलं. मात्र काही रहिवासी आपल्या घराच्या बाहेर जाण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी या रहिवाशांची समजूत काढली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं. सरतेशेवटी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आलं हे. या सर्व रहिवाशांना आता तिथून हलवण्यात आलं.
दरम्यान वरळी कोळीवाडा या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून इथे कर्फ्यू लावण्यात आल्यामुले नागरिकांना घराबाहेर पाडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आदर्शनगरमध्ये एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे. या दाम्पत्याला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या १४७ जागांना सील करण्यात आलं आहे. आता मुंबईच्या रुग्णांमध्ये अशीच वाढ होत राहिली तर मुंबईच्या सर्व जागा सील करायची वेळ येऊ शकते.
ten novel corona virus covid19 positives found in worli kolivada of mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.