मुंबई

डॉक्टररूपी "देव" बाटला! मृत्यूच्या दाखल्यासाठी केली पैशांची मागणी

दीपक घरत : सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कोरोनासारख्या जागतिक महामारीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत, तर दुसरीकडे काही डॉक्टर रुग्णांच्या असाह्यतेचा फायदा उचलत असल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन पनवेल येथे एका डॉक्टरने नातेवाइकांकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार घडला.

"सकाळ"कडे याबाबतची माहिती आली असता, कोरोनाचा संसर्ग होईल अशी भीती दाखवून मृतदेह न पाहताच संबंधित डॉक्टर दाखला देण्यास तयार असल्याचे पाहायला मिळाले. नवीन पनवेलमध्ये खासगी रुग्णालय चालवणाऱ्या या डॉक्टरला पैसे देण्यास असमर्थता दाखवली असता, पैसे खर्च करायचे नसल्यास उपजिल्हा रुग्णालयात मृतास न्यावे लागणार असल्याचे सांगत कोरोनाने त्याचा मृत्यू झालेला आहे का, याची चाचणी करून मृताच्या नातेवाइकांची चाचणी करण्याच्या सूचना तेथील अधिकारी करतील आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्तीमागे 5 हजार रुपये खर्च करावे लागतील, असे सांगितले. आम्हाला 10 हजार दिल्यास मृत न पाहताच दाखला उपलब्ध करून देण्याची तयारी डॉक्टरने दाखवली. अखेर संबंधित दाखला 'सकाळ'ला कसल्याही प्रकारे मृताची अथवा त्याच्या कागदपत्रांची शहानिशा न करता दिला. 

खासगी डॉक्टरना सरकार वाऱ्यावर सोडत असल्याने हा प्रकार करत असल्याची कबुली डॉक्टरने दिली. आम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असून, मृताला तपासताना आम्हाला लागण झाल्यास सरकार डॉक्टर म्हणून आमची चाचणी मोफत करत नाही तर चाचणी करण्यासाठी लागणारे पैसे खिशातून खर्च करावे लागणार असल्याने पैशांची मागणी केल्याचा दावा दाखला देणारे डॉक्टर महेश महाजन यांनी केला. 

सध्या सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचा फायदा उचलून जर कोणी असे प्रकार करत असेल तर त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणे आवश्यक आहे. 
- गणेश देशमुख, आयुक्त

मृताची शहानिशा न करताच जर कोणी अशाप्रकारे दाखला देत असेल तर ते चुकीचे आहे. तसेच कोरोनाची भीती दाखवून असे कारनामे कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याबाबत चौकशी होईल. 
- डॉ. राजेंद्र इटकरे, अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आदेश.

मृत्यू दाखला देण्यासाठी डॉक्टरांनी 10 हजार रुपायांची मागणी केल्याच्या "सकाळ"च्या वृत्ताची गंभीर दखल घेत संबधित डॉक्टरची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित डॉक्टर चे औडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT