मुंबई

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

संतोष कानडे

मुंबईः धारावीमध्ये एका मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

शनिवारी सकाळी जेव्हा मुंबई महानगर पालिकेचे लोक मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी दाखल झाले तेव्हा ही घटना घडली. यावेळी संतप्त जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संतप्त जमावाने महानगर पालिकेच्या गाड्यांची तोडफोड केली. पोलिस आंदोलकांशी बोलणी करत आहेत. याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलेलं आहे. मुस्लिम समूदाय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या पोलिस आंदोलकांची चर्चा करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी मोठा फौजफाटा धारावीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Marathi New Movie : हिटलरच्या भूमिकेसाठी इतके अर्जदार ! ही आहे परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची भन्नाट कास्ट

Latest Marathi News Updates : आरळा-बेरडेवाडी-कोकणेवाडी रस्त्यासाठी पावणेसहा कोटी मंजूर- धैर्यशील माने

VBA First List: वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

SCROLL FOR NEXT