ठाणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीची चिंता नाही, 'निसर्ग'मुळे धरणसाठ्यात वाढ...  
मुंबई

ठाणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीची चिंता नाही, 'निसर्ग'मुळे धरणसाठ्यात वाढ...

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गुरुवारीही शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. शहराबरोबरच धरण क्षेत्रातही वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण परिसरात गुरुवारीही पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी धरण परिसरात 120 मिलिमीटर, तर पाणलोट क्षेत्रात सरासरी 57.25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली असल्याचे एमआयडीसी विभागाकडून सांगण्यात आले. 

मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि पुणे जिल्ह्यातील टाटाच्या आंध्रा धरणातून उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. धरणाची उंची वाढविण्यात आल्याने यंदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी कपातीचा सामना करावा लागला नाही. त्यातच आता वरुणराजानेही सक्रिय होण्याअगोदरच कृपादृष्टी दाखविण्यास सुरुवात केली आहे. बारवी धरण परिसरात मागील वर्षी 28 जूनपर्यंत पावसाचा जोर जास्त नव्हता. यंदा मात्र मोसमी पाऊस सक्रिय होण्याअगोदरच बारवी धरण परिसरात 144 मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा जुलैअखेरीस धरण ओव्हर फ्लो होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी धरण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत बारवी धरण परिसरात 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी 229 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी 57.25 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. आत्तापर्यंत पाणलोट परिसरात सरासरी 73.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारवी धरणात सध्याच्या घडीला 140.54 दलघमी पाणीसाठा असून, 41.48 टक्के धरण भरलेले आहे. गेल्या वर्षी 4 जूनपर्यंत धरणामध्ये 22.46 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा
मोसमी पाऊस सक्रिय होण्याआधी दर वर्षी बारवी धरणामधील पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणी कपातीला तोंड द्यावे लागते. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने यंदा प्रथमच उन्हाळा संपल्यानंतरही धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचा सामना करावा लागला नाही. त्यातच या वर्षी मोसमी पाऊस सक्रिय होण्याअगोदरच चक्रीवादळामुळे धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाला आहे. मागीलवर्षी जूनअखेरपर्यंत धरण परिसरात पावसाचा जोर नव्हता; परंतु जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरले होते. यंदाही जून-जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्यास जुलैअखेरीपर्यंत धरण भरण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. 

 
बारवी धरण क्षेत्रात बरसला

गाव आजचा पाऊस (मिमी) आत्तापर्यंतचा पाऊस (मिमी) 
कान्हिवरे  46 46
कान्होल 73 95
पाटगाव 50 70
ठाकूरवाडी 60 83

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT