Thane: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सावरोली(बु)जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने पुढाकार घेऊन दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत विध्यार्थ्याकडून 20 हजार सीड बॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्राथमिक शाळेच्या शिक्षणा सहित विध्यार्थ्यांना समाजोपयोगी कामे करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी केलेल्या या उपक्रमाचे शहापुरचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे व गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी सिडबॉल रोपण करताना कौतुक केले व या उपक्रमाची इतर शिक्षकांनी दखल घेऊन आपल्या शाळेत असे समाजोपयोगी उपक्रम राबवावे असे सांगितले.
सावरोली( बु)शाळेत 74 विध्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम आत्मीयता जागृत कर णे. पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ह्या उपक्रमाची संकल्पना ह्या शाळेतील शिक्षिका पूनम उबाळे यांनी अंमलात आणली. विविध बिया, माती, शेणखतापासून विध्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या सीड बॉल ,शाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी, सहशिक्षक अरुणा शेलार, विजयकुमार उदार, सरपंच रोहन चौधरी, उपसरपंच शुभम चाभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले आहे.
"शाळेतील विध्यार्थी बोर, चिंच, जांभूळ खाऊन त्यांच्या बिया शाळेच्या आसपास टाकत असतात असतात. त्यामुळे सिडबॉलसाठी बिया विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध शकल्या आणि ह कमी पावसातही या बिया सहज रुजतात त्यामुळे परिसरात टाकण्यात आलेल्या सिडबॉल पासून अर्धे जरी झाडे आलीतरी आमच्या प्रयत्नांना यश आल्यासारखे आहे विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली." पूनम उबाळे,शिक्षिका.
"पहिल्यांदा असा उपक्रम शाळेत करण्यात आल्याने खूप उत्सुकता लागली होती. बियांपासून सीड बॉल बनवणे ही एक भन्नाट कल्पना होती. आपण नेहमी फळे खातो व बिया टाकून देतो आता मात्र उपक्रम सुरू झाल्याने बिया गोळा करून ठेवतोय आता वाट पाहतोय उगवणाऱ्या रोपांची."तन्मेश लुटे,विध्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.