मुंबई

Thane: सिव्हिलमध्ये उपचाराला उशीर झाल्याने आईचा व बालकाचा मृत्यू? वाचा काय आहे प्रकरण

Mumbai News: डॉक्टरांकडून उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, असे स्पष्टीकरण डॉ. कैलास पवार यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

सिव्हिल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. १३) घडली. उपचाराला उशीर झाल्यामुळे तिचा व बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील हाजुरीत रहिवासी रामलौतन राजभर यांची २५ वर्षीय मुलगी आरती राजभर ही गर्भवती होती. तिला त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी - सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती बिघडत असल्याने लगेच सिझेरियन करायला हवे होते.

मात्र, ही प्रक्रिया दुसऱ्या दिवशी रविवार (ता. १३) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सिझेरियनच्या वेळी बाळाचा मृत्यू झाला, तर पाच तासांनी मातेचाही मृत्यू झाला. सिझेरियनची प्रक्रिया उशीरा झाल्यामुळे मातेसह बळाचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हलगर्जीपणा झालेला नाही: डॉ. कैलास पवार

गरोदर महिला रुग्णालयात आल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान बाळ पोटातच दगावले होते. त्यानंतर तातडीने सीझर करण्यात आले; मात्र सीझर केल्यानंतर नसांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मातेचा मृत्यू झाला. डॉक्टरांकडून उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिले.

या घटनेनंतर एका डॉक्टरने तिच्या नातेवाइकांशी गैरवर्तन केले. याची तत्काळ दखल घेत त्या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. त्या डॉक्टराला जिल्हा रुग्णालयातून काढून उपसंचालक कार्यालयात परत पाठवण्यात आले असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT