मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमशान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. एकीकडे मुंबईतला कोरोना नियंत्रणात येत असताना ठाणे जिल्ह्यातील संकट वाढू लागलं आहे. त्यातच कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आता हे क्षेत्र कोरोनाचे एक नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयास येतंय.
ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढ असल्यानं ठाण्यात आयसीयू बेड्सही कमी पडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढत आहे की हा भाग ठाण्यालाही मागे टाकत आहे. या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती
बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ३६० झाली आहे. यापैकी ३० हजार ८२० रुग्ण बरे झाले असून ३४ हजार ७२१ रुग्णांवर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालय आणि मनपा संचालित ग्लोबल हब कोविड रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
पालिकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिव्हिल रुग्णालयात २५० बेड्स असून २३१ रुग्ण उपचार घेताहेत. म्हणजे सिव्हिल रुग्णालयात केवळ १९ बेड्सच रिक्त आहेत. मात्र रुग्णालयात एकही आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचं दिसून आलं आहे.
ग्लोबल हब कोविड रुग्णालयाची १०२४ बेड्सची क्षमता आहे. कर्मचारी नसल्यानं केवळ ४९९ बेड्सचाच वापर केला जातोय. त्यामुळे सध्या रुग्णालयात ४५० बेड्सवर रुग्ण उपचार घेताहेत. रुग्णालयात ७६ बेड्सचा आयसीयू आहे. मात्र सध्या तरी केवळ २४ बेड्सचाच वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
ठाण्यात काल दिवसभरात २७२ रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या ९ हजार १४८ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १८४ झाला आहे.
कल्याण डोंबिवली कोरोनाचं नवं हॉटस्पॉट
मंगळवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ४३३ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. अलीकडच्या काळात कल्याण-डोंबिवलीत वाढती रुग्ण संख्या पाहून हा भाग कोरोना हॉटस्पॉट होतोय की काय अशी भिती निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या वाढत्या घटनेसाठी KDMCला जबाबदार धरलं आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता 'धारावी पॅटर्न' कल्याण-डोंबिवली शहरात राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. प्रत्येक प्रभागातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना आणि खासगी डॉक्टर यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलंय.
Thane covid 19 situation worst kalyan dombivali new hotspot
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.