Thane Crime News 
मुंबई

Thane Crime News: प्रेयसीला मारहाण करत कारखाली चिरडले; भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा; तरुणी गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Thane Crime News: ठाण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाडने प्रेयसीच्या अंगावर कार घातली. विवाहित असल्याचं बिंग फुटलं म्हणून हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. अश्वजित गायकवाड हा भाजप पालघर जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या सुपुत्राने आपल्याच प्रेयसीला पहाटे ३ वाजता भेटण्यास बोलावून तिला शिवीगाळ करून मारहाण करीत हाताचा चावा घेतला. त्यानंतर कारमधील बॅग, मोबाईल घेण्यासाठी आलेल्या प्रेयसी फिर्यादी प्रिया उमेंद्र सिंग (२६) हिला धक्का दिल्याने कार खाली सापडून गंभीर जखमी केल्याची घटना ११ डिसेंबर, २०२३ रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रेयसी घोडबंदर रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचाहर सुरु आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात प्रियकर अश्वजित गायकवाड, शिवीगाळ करणारा रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमंक काय घडलं?

फिर्यादी प्रिया उमेद्र सिंग (२६) रा. 1701, ए विंग, ललानी रेसिडन्सी, बाघबीळ, सुरज वॉटरपार्क समोर, जी.बी. रोड, ठाणे(प) हिचे एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड (३४) रा. रोडास् हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड, ठाणे याच्याशी मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

प्रेयसी फिर्यादी प्रिया ही नवी मुंबई खारघर येथे बॉम्बे नेल कंपनी नावाचे सलून चालविते. तिला सलून चालविण्यासाठी बहीण आणि भाऊ मदत करतात. काही कारणास्तव अश्वजीत गायकवाड याच्याशी बिनसले होते. त्याने ११ डिसेंबर, २०२३ रोजी प्रियाला फोन करून कोर्टयार्ड हॉटेल ओयळा या ठिकाणी बोलावले. प्रिया भेटण्यासाठी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोहचली. तेव्हा अश्वजीत याचा अबोला कायम होता. प्रिया कारमध्ये बसलेली होती. सुमारे पाऊण तासाने कारजवळ अशवाजीत याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, सागर शेळके त्याचा बॉडीगार्ड शिवा हे घटनास्थळी आले. तेव्हा अश्वजीतने प्रियाला शिवीगाळी करीत मारहाण केली.

झटापटीत अश्वजीतने प्रियाच्या डाव्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे मित्र कार घेऊन निघताना प्रिया ही कारमधील तिची बॅग आणि मोबाईल घेण्यासाठी गेली असता तिला धक्का दिल्याने ती खाली पडली आणि रेंज रोव्हर कार खाली सापडली. प्रियकर अश्वजीत आणि मित्र गाडी वेगाने नेल्याने प्रियाच्या उजव्या पायावरून गाडी गेल्याने आणि तिची फरफट झाल्याने गंभीर अवस्थेत तिला टायटन मेडिसिटी खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Crime News)

सदरच्या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्रिया सिंग हीचा जबाब नोंदवून प्रियकर अश्वजित गायकवाड, शिवीगाळ करणारा रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेळके यांच्या विरोधात भादंवि ३२३, २७९, ३३८, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस तिघांचा शोध घेत आहेत.

महिला आयोगाकडून दखल-

भाजपचे पालघर जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षाने त्याच्या प्रेयसीला मारहाण केल्याच्या प्रकाराची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करून त्याबाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवण्यात यावा, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT