Thane Lok Sabha Esakal
मुंबई

Thane Lok Sabha: शिंदेंच्या अस्तित्त्वाची लढाई, ठाण्यात हा मुद्दा गाजणार! लोकसभेची तथ्यचित्रे

Thane Lok Sabha: मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाची लढाई ही मानाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीने खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाची लढाई ही मानाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीने खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित केले आहे. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघावर दावा केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांनीही येथे महायुतीचा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे कल्याण, ठाणे या दोन्ही मतदारसंघाचे गणित पुन्हा बदलण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी एकंदरीत येथे विकासाचा मुद्दा नव्हे तर निष्ठा हा मुद्दा या निवडणुकीत गाजणार आहे.

२०१९चे चित्र

राजन विचारे (शिवसेना) विजयी

मते : ७,४०,९६९

आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मते : ३,२८,८२४

मल्लीकार्जुन पुजारी (वंचित बहुजन आघाडी)

मते : ४७,४३२

नोटा मते : २०,४२६

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ४,१२,१४५

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित मात्र महायुतीच्या उमेदवारासाठी खलबते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केला असला तरी भाजप अजूनही आग्रही

मतदारसंघात विजयश्री खेचून आणणारा उमेदवार देण्यावर भर

निवडणूक रिंगणात कोण मातब्बर उतरणार याकडे मतदारांचे लक्ष

निष्ठेचा मुद्दा निवडणुकीत गाजणार

हे प्रभावी मुद्दे

विकसित नवी मुंबई, कोंडीत हरवलेले ठाणे आणि पश्चिम पट्ट्याला जोडलेल्या मिरा- भाईंदरमुळे प्रत्येक ठिकाणच्या

समस्या भिन्न

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारलेले प्रकल्प अजून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत

रखडलेली जलवाहतूक, मेट्रोची कामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT